घरमनोरंजन'या' गोष्टीत अक्षय कुमारने टाकलं खान कंपनीला मागे!

‘या’ गोष्टीत अक्षय कुमारने टाकलं खान कंपनीला मागे!

Subscribe

2019 च्या संपूर्ण ऑगस्ट महिन्यात स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर लोकप्रियतेमध्ये बॉलीवूड सुपरस्टार अक्षयकुमार अग्रेसर आहे. मिशन मंगल चित्रपटाच्या यशामूळे खिलाडी कुमार बराच कालावधी नंबर वन स्थानावर आला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

- Advertisement -

या आकडेवारीनुसार, डिजिटल न्युज (सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट), व्हायरल न्युज आणि प्रिंटन्यूजवर ऑगस्टच्या चारही आठवड्यात 100 गुणांसह अक्षय कुमार पहिल्या क्रमांकावर आहे. 29 ऑगस्टनंतर अक्षयच्या रॅंकिंगमध्ये थोडा फरक पडून तो तिस-या स्थानावर पोहोचला. परंतू ऑगस्ट महिन्यातल्या संपूर्ण आकडीवारीवर नजर टाकल्यास अक्षयने सलमान, शाहरुख, रणवीर आणि वरुणला मागे टाकले आहे.

“अक्षयच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि पोर्टल्सवर असलेल्या लोकप्रियतेमूळे आणि मिशन मंगलच्या बॉक्स ऑफिसवरच्या धमाकेदार यशामूळे अक्षयच्या लोकप्रियतेत कमालीचा फरक पडला. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आणि व्हायरल न्यूजमध्ये अक्षयकुमार अग्रेसर स्थानावर राहिला.”
– अश्वनी कौल, स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -