घरमनोरंजनवाढदिवसानिमित्त आलियाने शेअर केला 'सीता'चा फर्स्ट लूक

वाढदिवसानिमित्त आलियाने शेअर केला ‘सीता’चा फर्स्ट लूक

Subscribe

आलिया भट्ट ही लवकरच दक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करणार आहे. याबाबत तिच्या वाढदिवसानिमित्त तिने तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने १५ मार्च रोजी तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठे सरप्राइज दिले आहे. आलिया भट्ट तिचा २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसादिवशी आलियाने ‘आरआरआर’ चित्रपटामधील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात ती सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे आलिया तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजमौली आहेत. आलिया या चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. तिने तिच्या वाढदिवासादिवशी चाहत्यांसोबत चित्रपटातील तिच्या पात्राबद्दल सांगितले आहे. यासंबंधीची एक पोस्टही तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आलियाने शेअर केल्या या फोटोत ती ब्लेक शेडेड जागेवर ती बसली आहे. तिच्या फर्स्ट लूक पाहून असे दिसते की एखाद्या मंदिरात बसली आहे. व मंदिरात रामाची मूर्ती देखील पाहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

आरआरआर हा चित्रपट १३ ऑक्टोंबर २०२१ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलियासोबत ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण आणि राम चरम मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे पोस्टर, मोशन पोस्टर आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. दक्षिणात्य अभिनेता एसएसराजामौली यांने याचित्रपटाचा टिझर हा त्याच्या सोशलमीडिआ अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

याचित्रपटातील प्रत्येक पोस्टने प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढत आहे. हा चित्रपट जवळजवळ १० भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता हा चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हे वाचा- खिलाडी कुमारने चाहत्यांना दिली खुशखबर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -