घरमनोरंजन'अंगुरी भाभी'नं केली ट्रोलर्सची बोलती बंद

‘अंगुरी भाभी’नं केली ट्रोलर्सची बोलती बंद

Subscribe

कोणत्याही स्त्रीचं व्यक्तिमत्त्व लोकांनी तिच्या कपड्यांवरून ठरवू नये. आपण आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. लाज आणि संस्कृती ही बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. अंगुरी भाभीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

काळ्या आणि गुलाबी रंगाच्या मोनोकिनीमध्ये आपले फोटो पोस्ट केल्यानंतर ‘अंगुरी भाभी’ अर्थात शुभांगी अत्रेला नेटिझन्सनं ट्रोल करायला सुरुवात केली. थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेत असलेल्या शुभांगीनं मोनोकिनीतला फोटो पोस्ट केल्यानंतर असे कपडे घातल्याबद्दल काही नेटिझन्सनं तिला ट्रोल करायला सुरुवात केली. मात्र १२ वर्षाच्या मुलाची आई असलेल्या शुभांगीला याबद्दल अजिबात वाईट वाटत नसून अतिशय आत्मविश्वासानं ही परिस्थिती हाताळली.

शुभांगीचं सडेतोड उत्तर

‘समुद्रावर मी काय घालून जावं अशी लोकांची अपेक्षा आहे? नक्कीच मी तिथे साडी नेसून अथवा सलवार – कमीज घालून जाणार नाही ना? मी अतिशय फीट आहे आणि मला स्विमसूट घालायला आवडतो. अर्थात हा काही कोणता प्लॅन नव्हता. माझ्या नवऱ्यानं फोटो काढला तो मला आवडला आणि मी तो पोस्ट केला. यामध्ये वाईट वाटण्यासारखं काहीही नाही. स्क्रीनवरसुद्धा माझ्या कोणत्या पात्रासाठी बिकिनी घालयची असेल तर मी ती नक्की घालेन. जर माझं शरीर सुडौल असेल तर बिकिनी का घालू नये?’ अशा स्पष्ट शब्दांत शुभांगी अत्रेनं ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. ‘मी त्यामध्ये नक्कीच वाईट दिसत नाही. लोकांना नेहमी मी अंगुरी भाभीच्या अवतारात असावं असं वाटतं. पण मी ते पात्र निभावत आहे. मला स्वतःचं असं वेगळेपण आहे.’ असंही शुभांगीनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.
‘कोणत्याही स्त्रीचं व्यक्तिमत्त्व लोकांनी तिच्या कपड्यांवरून ठरवू नये. आपण आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. लाज आणि संस्कृती ही बघणाऱ्याच्या डोळ्यात असते,’ असं स्पष्ट आणि सडेतोड मत शुभांगीनं मांडलं आहे.

- Advertisement -

शुभांगी सध्या ‘भाभीजी घर पर है’मध्ये अंगुरी भाभीची भूमिका साकारत असून याआधी तिनं कस्तुरी, चिडिया घर, अधुरी कहानी हमारीसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -