घरदेश-विदेशबिहारमध्ये दारूसाठीच्या पैशातून होतेय साड्यांची खरेदी

बिहारमध्ये दारूसाठीच्या पैशातून होतेय साड्यांची खरेदी

Subscribe

मध, चीज, फर्नीचरच्या विक्रीतही कमालीची वाढ ! बिहार राज्यात २०१६ मध्ये दारूबंदी करण्यात आली होती. त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. दारूबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. याची माहिती एडीआरआय आणि डीएमआर यांच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

दारूबंदीसारख्या समाजहिताच्या उपक्रमातून चक्क महागड्या साड्या, मध आणि चीजच्या वस्तूंची विक्री वाढली असल्याचा अहवाल बिहार सरकारसमोर मांडण्यात आला आहे. सरकारने एप्रिल २०१६ रोजी बिहारमध्ये दारूबंदी लागू केली होती. त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. दारूबंदीनंतर या वर्षातील पहिल्या सहा महिन्यातच महागड्या साड्या, मध आणि चीज विक्रीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

बिहारमध्ये दारूबंदी

‘एशियाई विकास अनुसंधान’ (Asian Development Research Institute) (एडीआरआय) तसेच सरकारमान्य ‘विकास व्यवस्थापन संस्था’ Development Management Institute (डीएमआर) यांच्यावतीने दारूबंदीचा आढावा घेण्यासाठी राज्यात अभ्यासपथक नेमून सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातील अहवाल विधानसभेत मांडण्यात आला. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार दारूबंदीनंतर राज्यातील नवीन साड्यांच्या खरेदीमध्ये १ हजार ७५१ टक्के वाढ झाली असून मधाच्या विक्रीत ३८० टक्के तर चीज उत्पादन विक्रीत २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एडीआरआयने कॉम्फेड (बिहार स्टेट मिल्क को. ऑ. फेडरेशन) च्या दुकानांवर झालेल्या विक्रीचे विश्लेषण केले असता दूधाच्या विक्रीत ४० टक्के, फ्लेवर्ड मिल्क विक्रीत २८.४ टक्के तर लस्सी विक्रीत १९.७ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे निदर्शात आले आहे.

- Advertisement -

पाच जिल्ह्यांचा अभ्यास

डीएमआयने बिहारमधील नवादा, पूर्णिया, समस्तीपुर, पश्चिम चम्पारण आणि कैमूर या पाच जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणा केले. येथील २ हजार ३६८ कुटुंबियांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्राथमिक अहवाल बनवण्यात आला.

- Advertisement -

फर्नीचर, खेळण्यांच्या वस्तू विक्रीतही वाढ

खेळण्यांच्या खरेदीत वाढ

एडीआरआयने विक्री कर यादीच्या आधारे आणखी काही वस्तूंच्या विक्रीसंबंधी आकडेवारी अहवालात नमूद केली आहे. यामध्ये महागड्या साड्यांनी विक्री १ हजार ७५१ टक्के, महागडे कपडे ९१० टक्के, पारंपारिक खाद्यपदार्थ ४६ टक्के, फर्नीचर २० टक्के आणि खेळाशी संबंधीत वस्तूंमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गुन्हेगारीत मात्र घट

दारूबंदीमुळे राज्यातील गुन्हेगारीच्या घटना मात्र कमी झाल्या आहेत. यातील अपहरणाच्या घटनांमध्ये ६६.६ टक्के, हत्येच्या घटनांमध्ये २८.३ टक्के आणि दरोडेखोरीत २.३ टक्क्यांनी घट झाली आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये ४४ टक्के लोकं दारू पित होते. मात्र, एडीआरआयच्या अभ्यासानुसार एप्रिल २०१६ मध्ये दारूबंदी लागू केल्यानंतर प्रत्येक महिन्याला ४४० कोटी रुपयांची बचत होत आहे.

अहवालातील ठळक मुद्दे 

  • दारूबंदीनंतर नागरिक इतर वस्तूंसाठी आठवड्यामागे १ हजार ३३१ रुपये खर्च करत आहेत
  • दारूबंदीपूर्वी हाच खर्च १ हजार ००५ इतके रुपये इतका होता
  • दारूबंदीनंतर १९ टक्के कुटुंबियांनी नवीन प्रॉपर्टी विकत घेतली आहे
  • तर ५ टक्के लोकांनी आपल्या घराची डागडुजी केली आहे
  • दारूबंदीमुळे ५८ टक्के महिलांनी आदर वाढल्याचं सांगितले
  • तर २२ टक्के महिलांना गावातील गोष्टींमध्येही सहभागी करून घेतलं जात आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -