घरमनोरंजन'बचपन का प्यार'ने उडवली अनुष्का शर्माची झोप

‘बचपन का प्यार’ने उडवली अनुष्का शर्माची झोप

Subscribe

अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकांऊटवर एक मजेशीर मीम्स शेअर केला आहे.

आजच्या धावपळीच्या जगात लोकांना मनोरंजनाची नितांत गरज आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जग लॉकडाऊन दरम्यान घरामध्ये कैद होते. अशातच मनोरंजनासाठी लोकांचा कल मोबाईलकडे अधीकच वाढला . सोशल मीडियाद्वारे लोकांना मनोरंजनाची मेजवानीच उपलब्ध होऊ लागली असे म्हणायला हरकत नाही. यामध्ये इंस्टाग्राम रिल्ससुद्धा महत्वपुर्ण सहभाग आहे. सोशल मीडियावर सध्या टिक-टॉक बॅन झाल्यानंतर इंस्टाग्राम रिल्स हा एक नविन प्रकार नेटकऱ्यांच्या भेटीस आला. काही सेंदाच्या व्हिडिओद्वारे अनेक लोकं सोशल मीडियावर ट्रेंन्ड  होऊ लागली . सध्या इंटरनेटवर ‘जाने मेरी जानेमन,बसपन (बचपन) का प्यार मेरा भूल नहीं जाना’ हा रिल्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी यावर आपल्या वेगवेगळ्या अंदाजात इंस्टा रिल्स अपलोड केली आहेत. या रिल्सवर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील प्रतिक्रिया दिली आहे

अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकांऊटवर एक मजेशीर मीम्स शेअर केला आहे. तसेच या मीममध्ये तिने सांगितले आहे की, ‘बचपन का प्यार’ हे गाण तिच्या डोक्यातून निघण्याचं काही नाव घेत नाहिये, तिची रात्रीची झोप उडाली आहे. या सोबतच तिने हसण्याचे स्माईली शेअर करत इंस्टा स्टोरी पोस्ट केली आहे. या गाण्याने तिला चांगली भुरळ घातल्याचं दिसतंय.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे गाण सहदेव दिर्दो या मुलाचा आहे. या गाण्यामुळे सहदेव चांगलाच चर्चेत आलाय. इतकचं नाही तर प्रसिद्ध बॉलिवूड रॅपर बादशाहने देखील त्याची भेट घेतली आहे. तसेच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेत त्याचा सन्मान केला.

- Advertisement -

हे हि वाचा – HBD: संजय दत्तचे आयुष्य चित्रपटापेक्षा कमी नाही, या घटनेमुळे सापडला होता अडचणीत

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -