घरताज्या घडामोडीAsha Bhosale यांनी दिला लतादीदींच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा, पाहा दीदींचा अनसीन फोटो

Asha Bhosale यांनी दिला लतादीदींच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा, पाहा दीदींचा अनसीन फोटो

Subscribe

आशा भोसले यांनी लता दीदींसोबतचा बालपणीचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. फोटोमध्ये दोघी बहिणींमधील निरागसता दिसून येत आहे.

गानकोकिळा लता मंगेशकर (lata mangeshkar)  यांच्या निधनाने एका सुरमयी युगाचा अंत झाला. संपूर्ण देश आज लता दीदींच्या जाण्याने शोकाकूल आहे. लतादीदी आपल्याला सोडून कायमच्या गेल्या असल्या तरी त्यांच्या आठवणी त्या कायमस्वरुपी आपल्यासाठी सोडून गेल्या आहेत. दीदींच्या आठवणीत प्रत्येक जण दु:खी आहे. त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची बहिण आणि दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosale ) यांनी लता दीदींच्या सुंदर आठवणींना उजाळा दिला आहे.

आशा भोसले यांनी लता दीदींसोबतचा बालपणीचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. फोटोमध्ये दोघी बहिणींमधील निरागसता दिसून येत आहे. आशा भोसले यांनी फोटो शेअर करत म्हटले, ‘बालपणीचे दिवस किती छान होते. दीदी आणि मी’, असे म्हणत आशा ताईंनी दीदींवरील प्रेम व्यक्त केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

- Advertisement -

आशा ताईंनी लता दीदींसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. आशा ताईंना धीर देत त्यांना खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबियांसोबत आहोत. लता दीदी कायम आपल्यासोबत असणार आहेत, अशा प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या आहेत. तर लता दीदींच्या आठवणी हीच आपल्यासाठी सुंदर गोष्ट राहिली आहे, असेही एका चाहत्याने म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात लतादीदींनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी पोरकी झाली. लता दीदींचे पार्थिव दुपारी प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता दीदींवर दादरच्या शिवाजी पार्क येथे अंतिमसंस्कार करण्यात आले.


हेही वाचा – Lata Mangeshkar: प्रभूकुंज ते शिवाजी पार्क, लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -