घरमनोरंजनएका सत्य घटनेची 'बंदिशाळा'

एका सत्य घटनेची ‘बंदिशाळा’

Subscribe

२०१९या वर्षात सर्वाधीत चर्चीत चित्रपट म्हणजे मुक्ता बर्वे हीची मुख्य भुमिका असणारा ‘बंदिशाळा’ हा चित्रपट. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये मुक्ताची वेगळी भुमिका प्रेक्षकांसमोर आली आहे.

संजय कृष्णाजी पाटील यांनी या चित्रपटाचे लेखन व मिलिंद लेले यांनी दिग्दर्शन केले आहे. तर संगीतकार अमितराजने चित्रपटाच्या गाण्यांना सुंदर संगीत दिलं आहे. गायिका वैशाली सामंत, प्रियांका बर्वे, आरोही म्हात्रे, आरती केळकर व स्वतः अमितराज यांच्या रसाळ आवाजात स्वरबद्ध करून त्यातील गोडवा वाढवला आहे. या चार गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन आज सिटीलाईटमध्ये सर्व कलावंत तंत्रज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सोबत चित्रपटाच्या प्रोमोची झलकही पहायला मिळाली.

- Advertisement -

‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ या गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते तसेच ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित संजय कृष्णाजी पाटील यांनी एका सत्य घटनेचा आधार घेऊन बंदिशाळाचे कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन केले आहे. बंदिशाळा हा एक सामाजिक विषयावरील महत्वाकांशी चित्रपट असून त्याला एका कारागृहाची पार्श्वभूमी लाभली आहे. एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकाऱ्याची कथा या चित्रपटातून उलगडणार असून ही भूमिका आणि हा वेगळा विषय मुक्ता बर्वे या अभिनेत्रीने उत्तुंग शिखरावर पोहचविला आहे. तिने या चित्रपटात माधवी सावंत ही महिला तुरुंग अधिकारी जिवंत केली आहे. आजपर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका तिला या निमित्ताने करायला मिळाली आहे. संजय कृष्णाजी पाटील आणि मुक्ता बर्वे तब्बल १० वर्षानंतर एकत्र काम करीत आहेत.

- Advertisement -

मिलिंद लेले दिग्दर्शित ‘बंदिशाळा’ची सहनिर्मिती पायल गणेश कदम, मंगेश रामचंद्र जगताप यांनी केली असून प्रख्यात सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून हा घटनाक्रम पहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर विठ्ठल पाटील यांनी नृत्यरचना केली असून कार्यकारी निर्मितीची सूत्रे राम कोंडू कोंडीलकर यांनी सांभाळली आहेत. बंदिशाळातील चित्तथरारक साहसदृश्य प्रशांत नाईक यांनी दिग्दर्शित केली असून दिग्दर्शक मिलिंद लेलेंना सुनील मांजरेकर यांनी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात मुक्ता बर्वे यांच्यासोबतच विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे, हेमांगी कवी, सविता प्रभुणे, आशा शेलार, प्रवीण तरडे, अश्विनी गिरी, अजय पुरकर, माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके, राहुल शिरसाट, पंकज चेंबूरकर, लक्ष्मीकांत धोंड, अनिल राबाडे, उमेश बोलके, अनिल नगरकर आणि उमेश जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -