घरताज्या घडामोडीत्याने असं काही केलं त्यामुळे राखी सावंतला करावं लागलं अर्जंट लग्न!

त्याने असं काही केलं त्यामुळे राखी सावंतला करावं लागलं अर्जंट लग्न!

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत तिच्या सिक्रेट लग्नामुळे चांगलीच चर्चेत राहिली. सगळ्यांना तिचा नवरा कोण?, तो कसा दिसतो? याबद्दल फार उत्सुकता होती. पण राखीने फक्त नवऱ्याचं रितेश नाव असल्याचं जाहीर केलं. राखीने लग्न केल्यानंतर तिचा नवा कधीच कॅमेरा समोर आला नाही. मात्र, लग्न केल्याची खरी कबुली तिने बिग बॉसच्या घरात दिली आहे. शनिवारी झालेल्या विकेंडच्या वारला सलमानच्या गैरहजेरीत पत्रकारांनी बिग बॉसच्या घरातील सदस्यांवर प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली. नेहमीप्रमाणे हा देखील एपिसोड चांगलाच चर्चेत राहिला. या एपिसोडमध्ये राखीने अनेक खुल्लासे केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

पत्रकारांनी राखीला प्रश्न केला की, तुझ्या लग्नाबाबत इतकी चर्चा का होते? तू खरंच हे लग्न केलं आहे? की नाटक करतेय? त्यावेळेस राखी म्हणाली की, ‘मी खरंच लग्न केलं आहे. माझ्या आयुष्यात काही अडचणी आल्यामुळे मी लग्न केलं. ज्याप्रमाणे लोकं अर्जंट शॉपिंगला निघतात, काही जणं ब्रेकअप करतात. त्याचप्रमाणे मी अर्जंट लग्न केलं. मला एका देशातील मोठ्या व्यक्तीने धमकी दिली होती. जर मी लग्न नाही केलं तर तो मला उचलून नेईल. या धमकीबाबत मी पोलिसात तक्रार केली नाही.’ त्यावेळेस पत्रकारांनी त्या व्यक्तीचं नाव सांगण्यास सांगितलं. पण राखी म्हणाली की, ‘जर मी आता धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगितलं तर तो मला शो मधून हा दरवाजा तोडून उचलून घेऊन जाईल. या व्यक्तीच्या धमकीमुळे मी लग्न केलं. यामध्ये माझा पती रितेशचा गुन्हा नाही. मी त्याला फक्त माझ्याशी लग्न करायला सांगितलं. मी लग्नाआधी त्याला पाहिलं नव्हतं. त्याचा मी फक्त बँकेचा बॅलेन्स पाहिला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

- Advertisement -

सध्या राखी बिग बॉसच्या घरातील सर्वात मनोरंजन करणारी व्यक्ती ठरली आहे. ती नेहमी तिच्या नौटंकीमुळे चर्चेत असते. मागील काही दिवसांमध्ये राखीने तिच्या नवऱ्याच्या अनेक गोष्टी घराच्या सदस्यांसोबत शेअर केल्या. तसेच तिने अभिनव शुक्लावरील असलेल्या प्रेमाची देखील कबुली दिली आहे. याबाबत तिला पत्रकारांनी विचारले की, अभिनवच्या प्रेमात पडून तू तुझ्या पतीचा विश्वासघात करतेस का? तेव्हा ती म्हणाली की, ‘अजिबात नाही. माझ्या पतीला मी अजिबात धोका देत नाही आहे. अभिनवला पाहिलं तर माझ्या हृदयात धडधड होते, याला मी काय करू?


हेही वाचा – Video: अभिनव राखी सावंतला नेसवणार साडी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -