घरमहाराष्ट्रअखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

Subscribe

पहिले वैज्ञानिक साहित्यिक म्हणून नारळीकरांना मान

नाशिक येथे होणाऱ्या आहमी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची नावाची घोषणा झाली आहे. अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ललित अंगाने विज्ञानविषयक लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचे नावाची चर्चा होती. परंतु आज पार पडलेल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. परंतु याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. पहिले वैज्ञानिक साहित्यक म्हणून नारळीकरांना नवी ओळख मिळणार आहे.

न्यूज १८ लोकमतशी बोलताना डॉ. जयंत नारळीकर यांनी पहिली प्रतिक्रिया देताना सांगितले की , हे माझ्या आयुष्यातील मोठे आव्हान असणार आहे. विज्ञानाशी निगडीत साहित्याला अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी प्रयत्न करने, साहित्य आणि विज्ञानाची एक जवळीक आहे. कारण विज्ञानातील गोष्टी साहित्याच्या माध्यमातून जनमानसातून आणू शकतो . तसेच विज्ञानातील गुणदोष, बदल या साहित्याच्या माध्यमातून आणू इच्छितो. विज्ञान विषयाचा साहित्यात जास्त विचार झालेला नाही त्यामुळे माझ्या निवडीमुळे मला हा विषय लोकांपर्यंत आणण्याची संधी मिळाली आहे.  जागतिक कीर्तीचे संशोधक आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळावा, अशी चर्चा साहित्यवर्तुळात सुरू झाली आहे. परंतु आज हे निश्चित झाल्याने पहिले वैज्ञानिक साहित्यक म्हणून जयंत नारळीकर निश्चित झाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये अद्याप विज्ञानलेखकाला हा सन्मान मिळालेला नाही तो या निवडीमुळे आज पक्का झाला आहे.

- Advertisement -

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली. या त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत – गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.१९६७– ७२ मध्ये ते केंब्रिज विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरेटिकल ॲस्ट्रॉनॉमी या संस्थेच्या अध्यापन व संशोधन वर्गाचे सदस्य होते. १९७३–७५ या काळात ते जवाहरलाल नेहरू फेलो होते. १९७४ पासून ते इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे फेलो आहेत. १९७६ साली ‘इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी’ने फेलोशिप देऊन त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव केला. ऑक्टोबर १९७२ पासून ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे खगोलीय भौतिकीचे प्राध्यापक म्हणून कार्य करीत आहेत. नारळीकर यांनी आर्. जे. टेलर, डब्ल्यू. डेव्हिडसन आणि एम्. ए. रूडरमन यांच्या समवेत ॲस्ट्रोफिजिक्स (१९६९) आणि फ्रेड हॉईल यांच्या समवेत ॲक्शन ॲट ए डिस्टन्स इन फिजिक्स अँड कॉस्मॉलॉजी (१९७४) हे ग्रंथ लिहिले. तसेच स्ट्रक्चर ऑफ द युनिव्हर्स (१९७७). हा त्यांचा ग्रंथही प्रसिद्ध झाला आहे. खगोलीय भौतिकी, गुरुत्वाकर्षण, विश्वोत्पत्तिशास्त्र इ. विषयांवरील त्यांचे ७० हून अधिक संशोधनात्मक निबंध आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत. यांखेरीज त्यांनी काही विज्ञान कथा लिहिलेल्या असून वैज्ञानिक विषयांवर सुलभ भाषेत व्याख्याने देण्यासंबंधी त्यांची ख्याती आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -