घरमनोरंजनBigg Boss 15 : अभिजीत बिचकुलेने टास्कदरम्यान देवोलिनाकडे मागितली Kiss, अभिनेत्रीने केला...

Bigg Boss 15 : अभिजीत बिचकुलेने टास्कदरम्यान देवोलिनाकडे मागितली Kiss, अभिनेत्रीने केला हंगामा

Subscribe

बिग बॉस १५ मध्ये सध्या फिनालेची स्पर्धा सुरु आहे. निर्मात्यांनी या स्पर्धेचा एक नवा प्रोमो नुकताच रिलीज केला होता. ज्यामध्ये घरात एका मुद्द्यावरून खूप गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे देवोलिना भट्टाचार्जी खूप संतापल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले. यात बिग बॉसने स्पर्धकांना एक टास्क दिला आहे. ज्यात प्रत्येकाला म्युझियममधून वस्तू चोरायच्या आहेत आणि यावेळी अभिजीत अनेक गोष्टी चोरताना दिसतोय.

यावेळी अभिजीत असे काही कृत्य करतो जे देवोलिनाला अजिबात आवडत नाही आणि ती अभिजीतवर भडकते. अभिजीत देवोलिनाशी बोलत असताना त्याच्याकडे चोरीच्या अनेक वस्तू आहेत असे सांगत असतो आणि तिच्या गालाला स्पर्श करतो. मात्र सुरुवातीला देवोलीना यावर काहीच बोलत नाही.

- Advertisement -

मग अभिजीत म्हणतो की, तुझ्यासाठी काहीही करेन, पण मला किस पाहिजे. हे ऐकून देवोलिना रागाने रडू लागते. यावेळी अभिजीतला ती ठणकावून सांगते की, त्याने त्याच्या मर्यादेत राहावे. तसेच चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नको असेही बजावून ठेवते. यावर अभिजीत स्पष्टीकरण देतो की, तो विनोद करत होता. मात्र देवोलीनाचा राग काही केल्या शांत होत नाही आणि त्याला गप्प राहण्याचा इशारा देते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

यावेळी प्रतीक सहजपाल आणि तेजस्वी देवोलिनाच्या समर्थनार्थ पुढे येतात. यावेळी तेजस्वी देवोलिनाला विचारते की, अभिजीतने तुला ब्लॉकमेल केले आहे का? यावर देवोलिना हा म्हणताच तेजस्वी देखील अभिजीतवर चांगलीच तापते.

यापूर्वी करण आणि तेजस्वी यांच्याच जोरदार भांडण झाले होते. यामुळे दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा दुरावा निर्माण झाला होता. मात्र देवोलिन अभिजीतला खूप सपोर्ट करायची. घरातील अनेक सदस्य अभिजीतच्या विरोधात असतानाही देवोलीनाने त्याला मदत केली. इतकंच नाही तर अभिजीत आणि शमिता शेट्टी यांच्यात भांडण झाले तेव्हाही देवोलिनाने अभिजीतला साथ दिली. मात्र बिग बॉस अभिजीतने देवोलिनासोबत केलेल्या कृत्यासाठी काय शिक्षा देतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष होणार, मोदी सरकार याच अधिवेशनात आणणार विधेयक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -