घरमनोरंजन'ही' स्पर्धक म्हणतेय; माझ्यामुळे मेघा बनली 'बिग बॉस'ची विनर

‘ही’ स्पर्धक म्हणतेय; माझ्यामुळे मेघा बनली ‘बिग बॉस’ची विनर

Subscribe

फेम ‘देवयानी’ म्हणजेच अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने बिग बॉसच्या पहिल्या सिझनमधील एक धक्कादायक खुलासा केला आहे.

तुमच्यासाठी कायपण…’ हा डायलॉग जिच्यासाठी बोलला जायचा अशी फेम ‘देवयानी’ म्हणजेच अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भाग घेतला आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून शिवानी अभिजीत बिचुकलेसोबत सारखे वाद घालत आहे. सध्या ती चांगलीच चर्चेत असून तिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना खुलासा केला आहे. तिने सांगितले आहे की, ‘मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिझनमधील विजेती मेघा धाडे ही माझ्यामुळे विजेती झाली आहे‘, असे म्हणत शिवानीने मेघाच्या विजयाचे श्रेय घेतले आहे.

- Advertisement -

मेघाला मी केले मार्गदर्शन

मेघा धाडे आणि शिवानी सुर्वे यांच्यात चांगली मैत्री आहे. तसेच सोशल मीडियावरही या दोघांचे अनेक एकत्र फोटो देखील पाहायला मिळतात. मात्र या मैत्रिणींचे एक गुप्तीत समोर आले आहे. ‘मेघाला पहिल्या सिझनसाठी मी मार्गदर्शन केले होते. तसेच तिचा विजय हा माझ्यामुळे झाला आहे. इतकच नव्हे तर घरातील तिचे कपडे आणि एकंदर स्टाइल यासाठी देखील मी तिला सल्ला दिला होता‘, असा खुलासा शिवानी सुर्वे हिने बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी केला होता. तसेच मेघा धाडेप्रमाणे आता शिवानी बिग बॉस मराठीची विजेती होणार का? यात तिला मेघाची साथ मिळेल का? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -

वाचा – मराठी बिग बॉस २’ मधील नवे चेहरे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -