घरमनोरंजनबिपाशा हॉस्पिटलमध्ये; उपचार सुरु

बिपाशा हॉस्पिटलमध्ये; उपचार सुरु

Subscribe

बॉलीवूडची बाँग गर्ल बिपाशा बासू ग्रोवर सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. गेले काही दिवस तिच्या हॉस्पिटल वाऱ्या सुरुच होत्या, त्यामुळे तिला नेमकं काय झालं आहे? हे तिच्या चाहत्यांना कळत नव्हतं. चाहत्यांची काळजी पाहता बिपाशाने आता तिला नेमकं काय झालंय ते इन्स्टाग्रामवरुन सांगितलं आहे. बिपाशाला ‘व्हायरल इन्फेक्शन’ झालं असून त्यासाठीच ती सध्या उपचार घेत आहे.

इन्स्टावरुन केला फोटो शेअर

- Advertisement -

बिपाशा इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. रविवारी तिला मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ती हॉस्पिटलमध्ये असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. हे बिपाशाला समजताज तिने स्वत:च इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी एक पोस्ट केली. ‘ माझ्या चाहत्यांनी काळजी करण्याची काही गरज नाही. एका व्हायरल इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये आहे. पण लवकरच फिट आणि फॅब्युलस अवतारात परतेन,असा मॅसेज देत तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे.

 

- Advertisement -
BIPASHA INSTAGRAM
बिपाशा बासूने इन्स्टावर शेअर केलेला फोटो

 

बॉलीवूडची आयटम गर्ल

बिपाशाचे हिंदी चित्रपटांमधील करीअर पाहता, ती तिच्या ‘हॉट’ आणि ‘बोल्ड’ अंदाजासाठीच प्रसिद्ध आहे. २००१ साली आलेल्या ‘अजनबी’ या चित्रपटापासून तिने तिच्या बॉलीवूड करीअरला सुरुवात केली. शिवाय अनेक आयटम साँगमधून ती दिसली. ‘बीडी जलयले’ … या आयटम साँगमधून ती अधिक प्रसिद्धी झोतात आली. २०१५ साली ती ‘अलोन’ या हॉररपटातून दिसली. या सिनेमातील सहकलाकार करणसिंग ग्रोवरसोबत तिने २०१६ सली लग्न केलं.

 

bipasha-basu_karan-singh-grover__834127
‘अलोन’ या हॉररपटात करण सिंग ग्रोवरसोबत बिपाशा
akshay-kumar-and-bipasha-basu
‘अजनबी’ या सिनेमात बिपाशा आणि अक्षयकुमार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -