घरमनोरंजनबिपाशा बसूने दाखवली मुलीची पहिली झलक; कमेंट करत चाहत्यांकडून कौतुक

बिपाशा बसूने दाखवली मुलीची पहिली झलक; कमेंट करत चाहत्यांकडून कौतुक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू नुकत्याच काही दिवसांपूर्वी आई झाली. बिपाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, नुकतीच बिपाशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिपाशाने शेअर केलेली ही पोस्ट पाहून तिचे चाहते खूप खूश झाले आहेत.

बिपाशा बसूने शेअर केली मुलीची पहिली झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आई होण्यापूर्वीपासून बिपाशाने तिच्या बेबी बंपचे फोटो देखील शेअर केले होते. दरम्यान, आता शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये बिपाशा तिचा पती करण सिंब ग्रोवर यांनी त्यांच्या मुलीसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिपाशा आणि करण आपल्या मुलीकडे पाहताना दिसत आहेत. बिपाशाच्या या फोटोवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

2016 साली झालं बिपाशा-करणचं लग्न
बिपाशाने 2001 मध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अजनबी’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले होते. याशिवाय बिपाशा बसूने ‘राज’, ‘रक्त’, ‘फूटपाथ’, ‘ऐतबार’सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने शेवटचे 2015 मध्ये ‘अलोन’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर दिसला होता. तिथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. बिपाशासोबतचे हे त्याचे तिसरे लग्न आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने केला 100 कोटींचा टप्पा पार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -