घरताज्या घडामोडीप्रेक्षकांना मिळणार ब्लॅक कॉमेडीचा थ्रिलर 'झटका'

प्रेक्षकांना मिळणार ब्लॅक कॉमेडीचा थ्रिलर ‘झटका’

Subscribe

'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या जोडप्याची ही कहाणी असून दोघांमध्ये रोमान्स बहरण्याआधीच त्यांच्या प्रेमाला खूनाचे ग्रहण लागते. एका बंद कपाटातील अनोळखी माणसाच्या मृत्यूचा आरोप एका प्रेमीयुगलावर येऊन ठेपतो आणि सुरु होतो पोलिसांचा ससेमिरा.

मराठीतील पहिला ब्लॅक कॉमेडी थ्रिलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इटका हा मराठीतील पहिला ब्लॅक कॉमेडी थ्रिलर सिनेमाचा पहिला ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.  ‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या जोडप्याची ही कहाणी असून दोघांमध्ये रोमान्स बहरण्याआधीच त्यांच्या प्रेमाला खूनाचे ग्रहण लागते. एका बंद कपाटातील अनोळखी माणसाच्या मृत्यूचा आरोप एका प्रेमीयुगलावर येऊन ठेपतो आणि सुरु होतो पोलिसांचा ससेमिरा. हा सिनेमा ४ मार्च २०२२ला रिलीज होणार आहे.

 

- Advertisement -

या प्रेमीयुगलातील नायिका म्हणजे तुम्हा सर्वांची आवडती ‘तुला पाहते रे’ या प्रसिद्ध मालिकेतील पूर्णिमा डे. तिला साथ दिली आहे सिनेमाचा नवोदित अभिनेता गौरव उपासानी याने.  या दोघांच्या प्रेमाला लागलेला ब्रेक त्यांनाच सोडवताना येणारी नाकीनऊ  आलेले असताना त्यातून घडणारे विनोद ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यापासून आतापर्यंत ट्रेलरला २ लाख ३० हजार प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

उत्तेजना स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘झटका, आत्ता सुरुवात गोंधळाची’ या चित्रपटाचे डॉ पार्थसारखी आणि प्रेरणा उपासनी निर्माते आहेत. अजिंक्य उपासनी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि संवाद गौरव आणि अजिंक्य उपासानी या बंधू यांनी लिहिला आहे. तर खरा खुनी कोण हे तुम्हांला जाणून घ्यायचे असेल तर ४ मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ४ मार्चला प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडीचा थ्रिलर ‘झटका’ पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  Valentine’s Day निमित्त राजकुमार रावने पत्रलेखासाठी शेअर केली खास लव्हपोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -