घरमनोरंजनविराट कोहलीला करायचे आहे, स्वतःच्याच बायोपिकमध्ये काम! कारण...

विराट कोहलीला करायचे आहे, स्वतःच्याच बायोपिकमध्ये काम! कारण…

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय फुटबॉल खेळाडू सुनील छेत्री रविवारी संध्याकाळी इंस्टाग्रामवर मजेदार लाइव्ह चॅट करत होते. चित्रपट ते नात्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी चर्चा केली.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय फुटबॉल खेळाडू सुनील छेत्री रविवारी संध्याकाळी इंस्टाग्रामवर मजेदार लाइव्ह चॅट करत होते. चित्रपट ते नात्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी चर्चा केली. चर्चा करत असताना सुनील छेत्री यांनी कोहलीला त्याच्या बायोपिकमध्ये कोणाला बघायला आवडेल, असा प्रश्न विचारला ?

यावर विराट म्हणाला, ‘मला स्वतःला! मला असे वाटत नाही की, मी जसा आहे तसा कोणीही माझा अभिनय करू शकेल.’ यावर सुनील छेत्री यांनी असे उत्तर दिले, “माझा विश्वास आहे की ते तुम्ही करू शकता, कारण लोकांना माहित नसेल तुम्ही चांगला अभिनय देखील करू शकता.”

- Advertisement -

तसेच विराटने असेही सांगितले की, ‘माझ्यावर असणाऱ्या बायोपिकमध्ये मला स्वतःला अभिनय करावा लागेल. तसंही माझ्यापेक्षा कोण माझा चांगला अभिनय करू शकेल. ‘ महत्त्वाचे म्हणजे दोन नामांकित भारतीय खेळाडू जेव्हा गप्पा मारतात तेव्हा तुम्ही असा विचार कराल की, ते बोलणे फक्त खेळापुरते मर्यादित असेल, मात्र तसे झाले नाही, सुनील छेत्रीने कोहलीला त्याच्या लग्नाबद्दलही काही प्रश्न विचारले.

- Advertisement -

छेत्री यांनी सांगितले की, ‘मी अनुष्काशी बोलत होतो आणि मला तुमच्या अनोख्या नात्याबद्दल कळाले. यावर कोहलीने उत्तर दिले, ‘माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे आणि प्रेमाने आयुष्य जगता, तेव्हा तुम्हाला व्हॅलेंटाईन डेसारख्या विशेष दिवसाची आवश्यकता नसते. म्हणून स्वाभाविक होते की आम्हाला कधी औपचारिकता करावी लागणार नाहीत. आम्हाला फक्त हे माहित होते की आम्हाला लग्न करायचे आहे. ‘

दरम्यान, माझ्याच बायोपिकमध्ये मी काम करण्यास तयार आहे, पण माझी एक अट अशी आहे, या चित्रपटात अभिनेत्री म्हणून पत्नी अनुष्का शर्मानेही त्याच्यासोबत काम करायला हवे. विराट कोहली असेही म्हणाला, ” मी चांगला अभिनय करू शकतो असा एक गैरसमज आहे. मी फुटबॉल देखील खेळू शकतो. पण याचा अर्थ असा नाही न! तुम्ही मला आयएसएल (इंडियन सुपर लीग) मध्ये खेळायला घ्याल? शक्यच नाही! त्याच प्रकारे, मी कॅमेऱ्याला सामोरे जाऊ शकतो मात्र तुम्ही त्याला अभिनय म्हणू शकत नाही.


लॉकडाऊनमध्ये अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘हा’ भन्नाट फोटो, आणि म्हणाले…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -