घरमनोरंजनकंनगा रनौत कू ॲपवर ठरली 'नंबर वन' सेलिब्रिटी, फॉलोवर्सची संख्या लाखोंच्या घरात

कंनगा रनौत कू ॲपवर ठरली ‘नंबर वन’ सेलिब्रिटी, फॉलोवर्सची संख्या लाखोंच्या घरात

Subscribe

बॉलिवूडमधील बिंधास्त अभिनेत्री कंगना रानौतने आपल्या उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. कंगना रानौत तिच्या सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. ती सातत्याने तिचे नवे फोटो आणि आगामी प्रोजेक्टच्या अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर आपलं परखड मत व्यक्त करताना दिसते. यातील काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला अनेकदा टीकेचे धनी ठरवले जाते. यातीलच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना रनौतला मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्वीटरवरून सस्पेंड करण्यात आले.

मात्र ट्विटरवरून अकाउंट सस्पेंड होताच देसी कंगनाने कू (Koo) ॲपवर एंट्री घेतली. सध्या कू ॲपवर कंनगा रनौतची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता कू ॲपवरील ‘नंबर वन’ सेलिब्रिटीमध्ये कंगनाने सर्वोच्च स्थान मिळवले आहे. कूवर कंगनाचे १० लाख म्हणजेच १ मिलियन फॉलोअर्स आहेत.

- Advertisement -

कंगना रनौतने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कू ॲपवर आपले अकाउंट ओपन केले. आत्तापर्यंत या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंगनाचे १० लाखांच्या घरात फॉलोवर्स झाले आहेत. मात्र मागील तीन महिन्यात या फॅन फॉलोवर्सची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. कू ॲपवर जबरदस्त परफॉर्मस दाखवत १० लाखांपर्यंत फॉलोवर्स असणारी कंगना पहिली अभिनेत्री ठरली आहे. कंगनाने कू ॲपवरील आपल्या बायोमध्ये लिहिले की, ‘देश भक्त’ आणि सळसळत्या रक्ताची क्षत्रिय महिला. कंगना ने कू ॲपवरूनच आपल्या थलाइवी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले.

कूवर एंट्री घेताच कंगनाने पहिले कू केले ज्यात म्हटले की, कू घरी आल्यासारखे वाटते. बाकी सर्व भाड्याचे वाटते. कंगना फेब्रुवारी २०२१ वरून कूवर असून तिचे अकाउंट व्हेरिफाई करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -