घरमनोरंजनबॉलीवूडचे 'हे' दोस्त करतात एकत्र धमाल

बॉलीवूडचे ‘हे’ दोस्त करतात एकत्र धमाल

Subscribe

घट्ट मैत्री असणाऱ्या बॉलीवूडच्या जोड्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. कशी आहे यांची मैत्री आणि कशी करतात हे एकमेकांबरोबर मस्ती हे खास तुमच्यासाठी.

बॉलीवूड आणि मैत्री हा नेहमीच असणारा चर्चेचा विषय. ज्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये मैत्री पडद्यावर दाखवली जाते तशीच ती प्रत्यक्षातदेखील निभावताना इथे मित्र दिसतात. बॉलीवूडमधील लोकांचा ‘याराना’ हा नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय राहिला आहे. कोणता असा खास दिवस त्यांना हा मैत्रीचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी लागत नाही. अशाच काही घट्ट मैत्री असणाऱ्या बॉलीवूडच्या जोड्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. कशी आहे यांची मैत्री आणि कशी करतात हे एकमेकांबरोबर मस्ती हे खास तुमच्यासाठी.

द गॉसिप गर्ल्स

कपूर आणि अरोरा या बहिणींच्या मैत्रीविषयी सगळ्यांना माहीत आहे. करिना कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा आणि करिष्मा कपूर या चौघींचीही मैत्री अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांना नेहमीच बऱ्याच ठिकाणी एकत्र मजा करताना पाहिलं जातं. पार्टी असो, फिरण्याची गोष्ट असो, एकत्र जेवण असो या सर्वच ठिकाणी त्यांना एकत्र पाहिलं जातं. त्यांच्या मैत्रीलादेखील आता बरीच वर्ष झाली असून बॉलीवूडमध्ये त्यांना द गॉसिप गर्ल्स म्हणूनदेखील ओळख मिळाली आहे.

- Advertisement -
kareena, amruta, malika and karisma
गॉसिप गर्ल्स

करण जोहर, काजोल आणि शाहरूख

फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री काजोल आणि बॉलीवूडचा बादशाह शाखरूख खान यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पासून सुरु झालेल्या या मैत्रीला आता जवळजवळ ३ दशकं लोटली आहेत. काही महिन्यांपूर्वी काजोल आणि करण जोहरच्या मैत्रीत दुरावा आला होता. मात्र पुन्हा एकदा त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन ते एकत्र आले आणि बॉलीवूडनं मोकळा श्वास घेतला.

karan-srk-kajol
करण – काजोल आणि शाहरूख

‘गुंडे’ चे गुंडे खऱ्या जीवनातही बेस्ट फ्रेंड्स

रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर या दोघांमधील मैत्री ही खरंतर भाई प्रेमच आहे. दोघेही चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासून एकमेकांना ओळखत होते. दोघेही नेहमीच बऱ्याच ठिकाणी धमाल डान्स करताना आणि मस्ती करताना एकत्र दिसतात. दोघांनाही एकमेकांबद्दल सगळी माहिती असते, इतकी घट्ट मैत्री दोघांमध्येही आहे. सोनम कपूरच्या लग्नातही दोघांनी प्रचंड धमाल केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

- Advertisement -
ranveer-arjun
रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर

सोनम, जॅकलीन आणि स्वरा

बॉलीवूडची फॅशन आयकॉन समजली जाणारी सोनम कपूर आणि तिची बेस्ट फ्रेंड स्वरा भास्कर यांच्या मैत्रीची तर नेहमीच चर्चा होते. दोघीही इंडस्ट्रीमध्ये फटकळ म्हणून ओळखल्या जातात. ‘रांझणा’ चित्रपटापासून सुरु झालेली ही मैत्री अधिकच घट्ट होत गेली. तसंच सोनमची दुसरी फ्रेंड म्हणजे जॅकलीन फर्नांडिस. या दोघींनाही नेहमीच एकमेकींबरोबर वेळ घालवताना पाहण्यात आलं आहे. शिवाय सोशल मीडियावर दोघीही नेहमीच अॅक्टिव्ह असून आपले फोटोज पोस्ट करत असतात.

sonam and swara
सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि जॅकलीन फर्नांडिस

अॅक्टर आणि डिरेक्टरचा ‘याराना’

अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीची मैत्री तर सर्वांनाच माहीत आहे. बॉलीवूडमधील पक्के मित्र म्हणून यांची ओळख आहे. ‘वेक अप सिद’ पासून ते आता ‘ब्रम्हास्त्र’ पर्यंत खूपच मोठा प्रवास दोघांनी केला आहे. व्यक्तीगत आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्य त्यांनी आपल्या मैत्रीत अगदी समतोल सांभाळली आहेत. या दोघांनी एकत्र काम केलेला प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल चालला आहे.

Ranbir-and-Ayan
रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -