घरमनोरंजनअभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Subscribe

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर दिल्लीच्या मोरादाबाद येथे फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीररीत्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि अभिनेत्री असलेल्या सोनाक्षी सिन्हावर दिल्लीच्या मोरादाबाद येथे फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीररीत्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचू धक्का बसला ना. होय, हे अगदी खरं आहे. मागील वर्षी ३० सप्टेंबरला दिल्लीतील एका कार्यक्रमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नृत्य सादर करणार होती. त्यासंबधीचा करार तिने मोरादाबाद येथील एका कंपनीशी केला होता. मात्र शेवटच्या क्षणी तिने कार्यक्रमाला येण्यास नकार दिला. त्यामुळे कंपनीचे मालक प्रमोद शर्मा यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह तीन जणांविरोधात २४ नोव्हेंबरला मोरादाबाद येथे गुन्हा दाखल केला आहे.

नेमक काय आहे प्रकरण

दिल्लीच्या मोरादाबाद येथे ३० सप्टेंबरला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड्सच्या’ कार्यक्रमात नृत्य सादर करणार होती. त्यासाठी तिने आधीच आयोजकांकडून ३७ लाख रुपयांचे मानधनदेखील घेतले होते. मात्र शेवटच्याक्षणी तिने कार्यक्रमला येण्यास नकार दिला. त्यामुळे कंपनीचे मालक प्रमोद शर्मा यांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ३७ लाख रुपयांच्या मानधनासोबतच तिच्या प्रवासाठी, निवासासाठी, सुरक्षेसाठी अधिकचे ९ लाख रूपये देखील खर्च झाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, कार्यक्रमाला उपस्थीत राहण्यासाठी आम्ही तिला विनवणी केली. तसेच तिच्या अनुपस्थितीने आमचे खुप नुकसान होईल, असे देखील तिला सांगितले. मात्र तरीही तिने नकार कळवल्याने सोनाक्षीसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रेक्षकांची केली निराशा

अहवालानुसार ‘फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड्सच्या’ कार्यक्रमात सोनक्षी सिन्हा हजेरी लावणार असल्याने आणि नृत्य सादर करणार असल्याने तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र तिच्या अनुपस्थितीमुळे चाहते नाराज झाले. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी सामानाची तोडफोड केली आणि निघून गेले. त्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे देखील आयोजकांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी सोनाक्षीच्या वकिलांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा उत्तर आलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -