राहुल रॉयला सध्या काय झालंय?

Rahul roy new movie
राहुल रॉयमध्ये झालेला बदल

प्रेक्षकांना आपल्या ‘आशिकी’ने घायाळ करणारा कलाकार राहुल रॉय मागील काही काळ बॉलिवूडपासून दूर होता. बिगबॉस १ विजयी झाल्यानंतर राहुल पुन्हा कधी टीव्हीवर न झळकल्याने त्याने पुन्हा सन्यास घेतल्याची चर्चा रंगत होती. मात्र, या चर्चांना फोल ठरवत राहुल पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची तयारीत आहे. सध्या तो जैसलमेर येथे आपल्या आगामी चित्रपटाचे शुटिंग करतो आहे. आपल्या आगामी चित्रपटातील शुटिंगचे फोटो सध्या राहुलने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेत. या चित्रपटाचे नाव ‘वेलकम टू रशिया’ आहे.

राहुलमध्ये झालेला बदल
‘आशिकी’त रोमॅटिक हिरोची ओळख असलेल्या राहुलचा लूक या चित्रपटात बदललेला दिसणार आहे. राहुलने आतापर्यंत शेअर केलेल्या फोटोजवरुन राहुलचा रोल गंभीर असणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. फोटोत राहुल पांढऱ्या दाढीत दिसत असल्याने त्याला ओळखता येत नाही.

वेगळ्या भुमिकेत राहुल
राहुल ‘वेलकम टू रशिया’ चित्रपटात भारतीय वंशाच्या रशियन नागरिकाची भूमिका करणार आहे. या चित्रपटाबद्दल त्याने सांगितले की, “तन्विर अहमदच्या प्रॉडक्शनमध्ये काम करण्यास मला आनंद होतोय. या चित्रपटात प्रेक्षकांना चांगली प्रेमकथा बघायला मिळणार आहे. चित्रपटाचे संगीतही खूप सुंदर असून, ते नक्कीच लोकप्रिय होईल. या चित्रपटातील वेगळी भूमिका ही लोकांच्या मनात छाप सोडून जाण्यास नक्कीच यशस्वी होईल. या चित्रपटात रशियन पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत मी दिसणार आहे. हे पात्र इतर पोलिसांहून वेगळ्या स्वरुपाचे असेल. ”

राहुल रॉयचे चित्रपट करियर लहान असले, तरीही तो नेहमीच चर्चेत राहिला. १९९० ला प्रदर्शित झालेल्या आशिकी चित्रपटामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केले. मात्र त्याला हवे तसे यश मिळाले नाही. राहुलने काही भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले. चित्रपटातून घेतलेल्या विश्रांतीनंतर त्याने बिग बॉस मालिकेतून पुन्हा कमबॅक केले होते. बिग बॉस १ सिजनमध्ये झळकल्यानंतर राहुल पुन्हा टीव्हीवर पहिल्या सारखाच दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. राहुलने काही काळ भाजपत राहून देखील कार्य केले आहे.