Kangana Ranaut : कंगना रनौतमुळे वाढतोय कोरोना ; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हल्ली लोक कोरोनाच्या बाबतीत गेल्या दोन वर्षापासून छोट्या छोट्या सवयींमध्ये बदल करुन सतर्क झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक अधिक सावधानता बाळगत असून,कंगनाचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. कंगनामुळे कोरोना वाढत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Corona is growing because of Kangana Ranaut; Netizens trolled after watching VIDEO
Kangana Ranaut : कंगना रनौतमुळे वाढतोय कोरोना ; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. याशिवाय कंगना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतचं पीएम मोदींच्या सुरक्षा त्रुटींच्या प्रकरणामध्ये कंगनाने कॉंग्रेसवर टीका केली होती.त्यातच आता कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हल्ली लोक कोरोनाच्या बाबतीत गेल्या दोन वर्षापासून दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या सवयींमध्ये बदल करुन सतर्क झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक अधिक सावधानता बाळगत असून, कंगनाचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. कंगनामुळे कोरोना वाढत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान कंगनाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये तिने पापाराझींना पोज देण्यासाठी मास्क काढला आहे. त्यानंतर पेस्ट्री घेऊन जाणाऱ्या वेटरच्या प्लेटमधून फक्त पेस्ट्री उचलते आणि स्वत:च्या तोंडाजवळ नेते आणि फक्त पोज देते. त्यानंतर तिने ती पेस्ट्री न खाताच पुन्हा प्लेटमध्ये ठेवली आहे. अशा या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत कंगनाला ट्रोल केले आहे. कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार सरकारने स्वच्छतेबाबत काही नियम लागू केले आहेत. त्यामुळे कोरोनामध्ये असे केल्याबद्दल कंगनाला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

हा व्हिडीओ पाहून एका यूजरने लिहिले की, ‘हुशार! आधी तिने स्पर्श केला, नंतर तिने पेस्ट्री हातात घेऊन, नुसतंच पोज देऊन ते प्लेटमध्ये ठेवले, आता ते कोण खाणार?’ , याशिवाय कोरोना काळात असे करणे योग्य आहे का ? ,या अश्या कृत्यामुळे कोरोना वाढत आहे, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.


हेही वाचा – ST Workers Strike : स्वारगेट पाठोपाठ पंढरपूर आगारातून पहिली एसटी बाहेर; अनिल परबांच्या लॉबिंगला यश