करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी देसभरात लॉकडाऊन जाहीर झाला आहे. यामुळे नागरिकांना घरातच बसून रहावं लागत आहे. मात्र करोना व्हायरसचं भारतात येणं हृतिक रोशनच्या पथ्यावर पडलं आहे. हृतिकची घटस्फोटित पत्नी सुझान खान आपल्या मुलांसाठी पुन्हा घरी परतली आहे.
हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन सुझान घरी परतल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्याने सुझानचे आभार मानले आहेत. करोना व्हायरसचे संक्रमण संपूर्ण देशात सुरु असताना सुझानला आपल्या मुलांची फार काळजी वाटत होती. रेहान आणि रिधान ही दोन मुलं स्वत:चा सांभाळ कसा करत असतील हे तिला कळत नव्हतं. त्यामुळे मुलांच्या काळजीनं ती व्याकूळ झाली होती. परिणामी सुझानने मुलांसाठी पुन्हा हृतिकच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला.
हृतिकने पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काही जणांनी तर हृतिकला सुझान परतल्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.