घरCORONA UPDATECorona in Bollywood: रेखा यांच्यानंतर दिग्दर्शिका झोया अख्तर यांचाही बंगला सील

Corona in Bollywood: रेखा यांच्यानंतर दिग्दर्शिका झोया अख्तर यांचाही बंगला सील

Subscribe

देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील कलाकारांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. आतापर्यंत कनिका कपूर, किरण कुमार, झोया मोरानी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि एश्वर्या राय बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. दोनच दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील केला होता. त्यानंतर आता रेखा यांच्या अगदी बाजूला असलेला झोया अख्तर यांचाही बंगला सील करण्यात आला आहे. झोया अख्तर या बॉलिवूडच्या प्रसिद्ध लेखिका आणि दिग्दर्शिका आहेत.

मंगळवारी सकाळी पालिकेने झोया अख्तर यांचा बंगला सील केला. झोया आणि रेखा या दोघीही वांद्रे येथील बँडस्टँड येथील परिसरात राहतात. खबरदारीचा उपाय म्हणून झोया यांचा बंगला सील करण्यात आला आहे. तसेच बंगल्याबाहेर पालिकेने नोटीस देखील लावली आहे.

- Advertisement -

रेखा यांच्याप्रमाणेच अभिनेत्री सारा अली खान यांच्या वाहन चालकालाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच याआधी आमिर खान, करण जोहर, बोनी कपूर आणि जान्हवी कपूर यांच्या घरातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच अनुपम खेर यांची आई, भाऊ आणि वहिनीला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -