घरमनोरंजनरुके ना तू थके ना तू, झुके न तू म्हणत बिग बींनी...

रुके ना तू थके ना तू, झुके न तू म्हणत बिग बींनी दिल्या कोरोना योद्धांना अनोख्या शुभेच्छा

Subscribe

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन गेल्या वर्षभरापासून कोरोना योद्ध्यांसह अनेक गरजू कुटुंबियांना आपल्या परीने मदत करत आहे. यात कोणताही पब्लिसिटी नाही किंवा जाहिराबाजी नाही. कोरोनाविरोधात मैदानात उतरलेल्या फ्रंटलाईन कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी यांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. नुकतच बिग बींनी कोरोना योद्ध्यांसाठी एक अनोखा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये बिग बींनी त्यांचे वडील आणि कवी हरिवंशराय बच्चन यांची एक सुंदर कविता वाचून दाखवली आहे. अगदी आत्मियतेने आणि उत्साहात बीग बी ही कविता सादर केली ती पाहून सोशल मीडियावरही त्यांचा या कवितेचे भरभरुन कौतुक केले जात आहे. सध्या देशावर कोरोनाचे कितीही मोठे संकट असले तरी त्या सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येत लढले पाहिजे असे आवाहन बिग बींनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

बिग बींनी सादर केलेल्या कवितेचा ओळी

‘रुके ना तू, धनुष उठा प्रहार कर,
तू सबसे पहला वार कर,
अग्नि सी धधक-धधक,
हिरण सी सजग-सजग,
सिंग सी धहाड़ कर,
शंख सी पुकार कर,
रुके ना तू थके ना तू, झुके न तू ‘

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

या कवितेच्या सादरीकरणानंतर बिग बी सांगतात, या कवितेच्या ओळी माझे वडील हरिवंशराय बच्चन यांचे असून सर्वांचे मनोबल उंचावरणाऱ्या आहेत. देशासमोर संकटांची मालिका सुरु होती त्यावेळी वडीलांनी ही कविता लिहिली होती, परंतु आजही देशात कोरोनाची भयंकर परिस्थिती निर्माण झाल्याने ही कविता आजच्या परिस्थितीलाही साजेशी आहे. त्यामुळे ही कविता कोरोना लढ्यात सहभागी माझ्या प्रत्येक कोरोना योद्ध्यांसाठी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी समर्पित आहे. त्यामुळे मी या कवितेच्या माध्यमातून प्रत्येकाचा उत्साह आणि मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. कारण हे सर्वजण आपल्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून प्राणाची बाजी लावत आहेत. त्यांचे मनोबल कायम राहण्याची गरज आहे. ही आपल्या सर्वांची देखील लढाई आहे. त्यासाठी आपण जेवढे करू शकतो ते सर्वकाही करायचे आहे. भारताच्या सुरक्षेसाठी आपल्या सर्वांना एकत्र यायचे आहे.’ असेही बिग बी म्हणाले.

बिग बींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ‘आपण लढणार, सर्वजण एकत्र येऊन लढणार आणि जिंकणार आहोत.’ सध्या ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -