Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन नेपोटिझमचा आरोप टाळण्यासाठी करण जोहरची नवी शक्कल

नेपोटिझमचा आरोप टाळण्यासाठी करण जोहरची नवी शक्कल

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची नवी प्रेमकथा येत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलीवूडचा दिग्दर्शक करण जोहर हा नेपोटीझमच्या वादात पुर्णपणे अडकला आहे. हा वाद टाळण्यासाठी करण जोहरने एक नवी शक्कल लढवली आहे. करण जोहरने आतापर्यंत अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी किडसना अभिनयाच्या क्षेत्रात उतरवले. अनेक बॉलीवूड अॅक्टर हे करण जोहरचा बोट पकडून या क्षेत्रात पदार्पण केले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे अनेकांनी करण जोहरवर नेपोटीझमचे आरोप लावले आहेत. करण जोहर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीरची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची नवी प्रेमकथा येत असून , करण जोहर स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मात्र या नेपोटीझमच्या वादामुळे करण जोहरने नवी शक्कल लढवली आहे. करण जोहरच्या या येत्या चित्रपटाद्वारे सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानचे या क्षेत्रात पदार्पण होणार आहे. सहायक दिग्दर्शक म्हणून तो या चित्रपटात काम करणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूर, वरुण धवन, वरुण धवन, अनन्या पांडे यांच्यासह अनेक स्टारकिडसना करण जोहरने बॉलीवूडसृष्टीत आणले होते. त्यामुळे करण जोहरवर नेपोटिझम आरोप सुरुच आहेत. त्यामुळे इब्राहिम अली खानलाही असेच आणले तर, अनेक टीकांना सामोरे जावे लागेल. म्हणून हा नेपोटिझमचा वाद टाळण्यासाठी करणने इब्राहिमला त्याच्या येत्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाचे काम दिले.

याअगोदरही करणने ४ नवे चेहरे बॉलिवूडमध्ये आणण्याची घोषणा केली होती. याशिवाय सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी करण जोहरवर नेपोटीझमचे आरोप लावले. यादरम्यान त्याला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.


- Advertisement -

हेही वाचा – Drugs Case: एजाज खानला NCBकडून अटक, घरात सापडलेल्या गोळ्यांवर अभिनेत्याचा खुलासा

- Advertisement -