घरदेश-विदेशमाजी पंतप्रधान एच डी देवेगौडा कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही संसर्ग

माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही संसर्ग

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असून देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्यूलरचे नेते एचडी देवेगौडा यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशी माहिती माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी ट्विट करून दिली. देवेगौडा यांनी असे सांगितले की, आम्ही दोघांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. ‘माझी पत्नी चेन्नमा आणि माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही दोघांनी स्वतःला घरात सेल्फ आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्या दोघांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अशी विनंती करतो. तसेच, पक्षातील कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही’, असे ट्विट एचडी देवेगौडा यांनी केले आहे.

- Advertisement -

देवेगौडा यांचे वय ८७ वर्ष असून १ जून १९९६ पासून ते २१ एप्रिल १९९७ पर्यंत देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. वयवर्ष ८७ असले तरी ते अद्याप राजकारणात सक्रीय आहेत. यापूर्वी ते कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते. तर सध्या ते राज्यसभेमध्ये खासदार देखील आहेत.

दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सलग सातव्या दिवशी ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. इतकेच नाही तर १६ डिसेंबरनंतर पहिल्यांदाच एका दिवसात साडे तिनशेहून अधिक कोरोना संक्रमित रूग्णांचा बळी गेला आहे. तर एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी देशात २४ तासांत ३०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

२४ तासांत देशात ५३ हजार ४८० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ हजार २८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आता देशातील एकूण कोरोनाबाधिताची संख्या १ कोटी २१ लाख ४९ हजार ३३५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६२ हजार ४६८ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १४ लाख ३४ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -