लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. रितेश देशमुख निर्मित ‘तार’ हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे पोस्टर अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडियावरून प्रदर्शित केले आहे. यात नागराज मंजुळे सायकल वरून पत्र पोहोचवणाऱ्या पोस्टमनच्या भुमिकेत दिसणार आहे.
Mumbai Film Company will be presenting series of Marathi Short Films made by some creative young minds.
‘Taar’ is one such amazing tale of a postman
Featuring- Nagraj Manjule
Directed By- Pankaj Sonawane
An Illusion Ethereal Studios ProductionTeaser Coming Soon
@mfc pic.twitter.com/Awy300OCks— Riteish Deshmukh (@Riteishd) October 25, 2020
रितेशची निर्मिती संस्था ही मुंबई फिल्म कंपनी या नावाने ओळखली जाते. रितेशच्या या निर्मिती संस्थेखाली काही मराठी लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याच निर्मिती संस्थेचा पोस्टमनची गाथा सांगणारा ‘तार’ हा पहिला लघुपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या लघुपटात नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
सध्याच्या काळात दुर्मिळ होत चाललेला पोस्टाचा डबा, बंद पडलेली तार सेवासह पोस्टमन काकांची कथा या लघुपटात पाहायला मिळणार आहे. नागराज मंजुळे ‘नाळ’ चित्रपटानंतर ‘तार’ या लघुपटात झळकणार आहे. ‘तार’ या लघुपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक पंकज सोनावणे यांनी केले आहे.
सध्या रितेश देशमुख त्याच्या आगामी बिग बजेट चित्रपटात व्यग्र आहे. रितेश आणि पत्नी जेनेलिया देशमुख हे दोघं मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधरित असलेल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाला संगीत देण्याची धुरा अजय-अतुल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. हा भव्य चित्रपट येत्या नव्या वर्षी अर्थात २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.