घरमनोरंजनएमसी स्टॅन ट्रॉफीसाठी लायक नसल्याची सोशल मीडियावर चर्चा

एमसी स्टॅन ट्रॉफीसाठी लायक नसल्याची सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

‘बिग बॉस 16’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये एमसी स्टॅन विजयी ठरला आहे. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या एसमी स्टॅनच्या नावाची घोषणा होताच एकच जल्लोष झाला होता. अटीतटीच्या ठरलेल्या स्पर्धेत एससी स्टॅनने बाजी मारल्याने त्याचे चाहते भलतेच खूष झाले आहेत. प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, शालीन भनोट, एमसी स्टॅन, अर्चना गौतम हे स्पर्धक टॉप फाईव्हमध्ये पोहोचले होते. परंतु, खरी लढत प्रियंका, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन या तिघांमध्ये झाली. त्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हाती पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

एमसी स्टॅन ट्रॉफी लायक नाही

‘बिग बॉस 16’च्या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगायचे झाल्यास प्रियांका आणि शिवच्या तुलनेत एमसी स्टॅनचा सहभाग खूप कमी असूनही तो जिंकल्यामुळे सोशल मीडियावर काहीजण बिग बॉसला ट्रोल करु लागले आहेत. अनेकांच्या मते, शिव ठाकरे किंवा प्रियंका ही ट्रॉफी जिंकण्या लायक होती. मात्र, तरीही एमसी स्टॅन विजयी घोषित केल्याने अनेकांनी बिग बॉसच्या निर्मात्यांवर संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, 23 वर्षीय एमसी स्टेनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. तो मुळचा पुण्याचा आहे. त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. यामुळेच वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्याने कव्वाली ऐकायला सुरुवात केली. यानंतर अल्ताफचे मन रॅपकडे अधिक आकर्षित होऊ लागले आणि मग हळूहळू तो रॅप करू लागला. आज स्टॅन एक रॅपर तसेच गीतकार आणि संगीतकार आहे. त्याची फॅन फॉलोइंगही करोडोंच्या घरात आहे.

 


हेही वाचा :

बिग बॉस १६ ची ट्रॉफी एमसी स्टॅनच्या हाती, पुण्याचा रॅपर ठरला विजयी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -