घरमहाराष्ट्रराज्यपाल गोल्डन गँगमधील सदस्य, त्यांचं काम लवकरच कळेल; संजय राऊतांचा निशाणा

राज्यपाल गोल्डन गँगमधील सदस्य, त्यांचं काम लवकरच कळेल; संजय राऊतांचा निशाणा

Subscribe

मुंबई – विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे त्यांनी पाळून ठेवले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’ चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’ च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही, अशी टीका संजय राऊतांनी आज अग्रलेखाच्या माध्यमातून केली होती. त्याबाबत पत्रकारांना सांगताना ते म्हणाले की, या सोनेरी टोळीचे काम लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल.

हेही वाचा – राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले, भाजपला नाही, संजय राऊतांचा खोचक टोला

- Advertisement -

या सोनेरी टोळीचे काम लवकरच सगळ्या महाराष्ट्राला कळेल. आता मी बोलत नाहीत. हळूहळू मी सर्वं समोर आणन. पत्रकारांना माझे आवाहन आहे की त्यांनी या सोनेरी टोळीचा शोध घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले.

टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंबर लागला नाही. यावरूनही त्यांनी शिंदेंवर टीकास्त्र डागलं. शिंदेंना कोणी मुख्यमंत्री मानत नाहीत. हे खूपच दुर्दैवी आहे की महाराष्ट्राचे नाव दहांतही नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कायम आजवर एक प्रगतीशील राज्य म्हणून गणले गेले. पण आज महाराष्ट्र दिल्लीच्या खिजगिणतीत नाही. सरकार पाडण्यात आले, तेच महाराष्ट्राचे पंख छाटण्यासाठी. महाकाराष्ट्राचे सरकार सध्या उतराला आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

राहुल गाधी यांना नोटीस बजावायचं काही कारण नाही. त्यांनी ज्या उद्योगपतीबद्दल प्रश्न उपस्थित केला, त्यावर उत्तर द्यायला हवे होते. त्यांना संधी होती. खरंतर त्यांनी हक्कभंग केला आहे सभागृहाचा आणि आमचा. त्यांनी जनभावनेचा हक्कभंग केला आहे. तुम्ही नियमांचा आधार घेवून नोटीसा पाठवत आहात हीच हुकूमशाही आहे, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपाच्या बैठकीत कोणताही ठराव होऊ शकतो. मुंबई महापालिकेसाठी ते १५० काय ४५० चाही आकडा लावतील. पण मुंबई महापालिका, ठाणे महापालिका जिथे सेनेचा झेंडा होता, तिथे शिवसेनाच विजयी होईल याची आम्हाला खात्री आहे. जो मुख्यमंत्री पहिल्या दहामध्ये येत नाही, त्याच्या नेतृत्वात भाजप निवडणूक जिंकूच शकत नाही, असाही हल्लाबोल त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -