घरमनोरंजनमराठी कलाकारांचे आठवणीतले दिवाळीतील किस्से

मराठी कलाकारांचे आठवणीतले दिवाळीतील किस्से

Subscribe

दिवाळीच्या निमित्ताने मराठी कलाकारांनी सुद्धा त्यांच्या आठवणीतले दिवाळीतले किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

सगळेच जण आनंदाने आणि उत्सवाने दिवाळी साजरी करत आहेत. सतत शूटिंग मध्ये बिझी असणारे मराठी कलाकार सुद्धा कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने मराठी कलाकारांनी सुद्धा त्यांच्या आठवणीतले दिवाळीतले किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

- Advertisement -

1) दिवाळीच्या आठवणीबद्दल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, दिवाळीत मी हैदराबादमध्ये शूटिंग करत होते आणि एका मुस्लीम डॉक्टरांच्या घरी आमचं शूटिंग सुरू होतं. त्या वर्षी दिवाळी आणि ईद एकत्रचं होतं. त्यावेळी शूटिंग करताना आम्ही सकाळी दिवाळीचा फराळ खायचो आणि संध्याकाळी डॉक्टरांच्या घरून आलेल्या शिर-कुर्मा खायचो. त्यावेळी आपण नक्की काय सेलिब्रेट करतोय हेच काळत नव्हतं. आम्ही सगळेच दोन्ही सणांचा आनंद लुटत होतो. ती दिवाळी आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करणारी वाटली होती. मी घरच्यांपासून दूर होते, पण डॉक्टर फॅमिलीनं ते कधीच जाणवू दिलं नाही.

 

- Advertisement -

2) अभिनेता विराजस कुलकर्णी त्याच्या दिवाळीच्या आठ्वणीबद्दल म्हणाला, नवीन लग्न झालाय त्यामुले यावर्षी सगळंच नवीन आहे. यासोबतच नवीन जबाबदारीचं भान राखावं लागणार आहे. आमच्या प्रोफेशनमध्ये सणासुदीलासुद्धा काम करावं लागतं. बऱ्याच वर्षांनी मी, शिवानी आणि आई-बाबा असे आम्ही सर्वच दिवाळीत आहोत, एकमेकांसोबत आहोत. त्यामुळे यावर्षीची दिवाळी आम्ही एकत्रच साजरी करणार आहोत. फटाक्यांमुळे पर्यावरणाचं नुकसान होतं म्हणून मी दुसरीत असल्यापासूनच दिवाळीला फटाके न फोडता मस्त मनमुराद फराळ खातो आणि दिवाळी साजरी करतो.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

3) माझा वाढदिवस 3 नोव्हेंबरला येतो त्यामुळे दरवर्षी तो दिवाळीत किंवा दिवाळीच्या आसपास येतो. दिवाळी माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असते. एक दिवाळी तर मी लंडन मध्ये साजरी केली होती. तेव्हा गजेंद्र अहिरे यांच्या एका चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. त्यामुळे तिथे दिवाळी साजरी करण्याचा वेगळा अनुभव आम्हा सगळ्यांना मिळाला. वडील असताना खूप हौसेने आम्ही दिवाळी साजरी करायचो. बालपणी फटाके वाजवायचो, पण निसगार्साठी धोकादायक असल्याचं जाणवल्यावर फटाके वाजविणे बंद केले. आम्ही दहा भाऊ आणि एक बहीण असल्याने आम्ही भाऊबीज सुद्दा खूप स्पेशल असते असंही अभिनय बेर्डे म्हणाला

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Mundhe (@kmundhe4442)

4) अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी सुद्धा त्यांच्या दिवाळीच्या आठवणी बद्दल सांगितले. आपली संस्कृती जपायला मला खूप आवडते. जेव्हा वसुबारस असते गाय-वासराची रांगोळी काढणं आणि दिवाळीत सकाळी आणि संध्याकाळ ठिपक्यांची रांगोळी काढायलासुद्धा आवडतं. मी कितीही बिझी असले तरीही यासाठी नक्की वेळ काढते. दोन वर्षांपूर्वी नेमकं दिवाळीतच अमेरिकेत शूटिंग होतं. त्यावेळी घरची दिवाळी खूप मिस करत होते. अमेरिकेतच माझी मैत्रीण प्रिया कृपलानी रहाते. मग मी तिच्या घरी दिवाळीला गेले. तिथे मी स्केचपेन्सने रांगोळी काढली. त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. तिथे त्यांच्या घरीही आम्ही लक्ष्मीपूजन केलं आणि व्हिडीओ कॉलवरून घरच्या देव्हाऱ्यातली पूजा आणि आरती केली. असं किशोरी शहाणे म्हणाल्या

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -