घरमनोरंजन'तुला पाहते रे' मधील ईशा करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री

‘तुला पाहते रे’ मधील ईशा करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री

Subscribe

मालिकेतील ईशा जशी साधी आहे तसे चित्रपटातील माझी भूमिका त्याविरुद्ध असणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे या मालिकेने काही काळात प्रेक्षकांची अल्पावधीतच मन जिंकली. ही मालिकेचा टीआरपीच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसते. या मालिकेतील ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री गायत्री दातार आणि विक्रांतची भूमिका सुबोध भावे हे साकारत असून दोघेही एकमेकांसोबत पहिल्यांदा काम करत असल्याने त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांची भावत आहे. याच मालिकेतील गायत्रीची ही पहिली मालिका असून आता ती लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

- Advertisement -

गायत्री रूपेरी पडद्यावर

छोट्या पडद्यावरून महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेली गायत्री ‘कोल्हापूर डायरिज या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. अंगमली डायरीज या सुपरहिट मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक असणार आहे. गायत्री दातार ‘कोल्हापूर डायरिज’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटामध्ये मी कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे. ती इतर मुलींपेक्षा खूप वेगळी असणार आहे. आता मालिकेतील माझी भूमिका पाहता सगळे मला ईशा म्हणून ओळखतात पण चित्रपटातील भूमिकेतून प्रेक्षक मला अगदीच वेगळ्या भूमिकेत पाहणार आहेत. मालिकेतील ईशा जशी साधी आहे तसे चित्रपटातील माझी भूमिका त्याविरुद्ध असणार आहे.’ असे या चित्रपटातील गायत्री दातारने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन यांनी केले असून या चित्रपटात गायत्री दातार सोबत भूषण नानासाहेब पाटील प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाचा सादरकर्ता संगीतकार अवधूत गुप्ते असणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -