घरमनोरंजनइंडियन आइडलवर आरोपांचा भडिमार,TRPसाठी करावे लागते खोटे कौतुक सुनिधि चौहानचा खुलासा

इंडियन आइडलवर आरोपांचा भडिमार,TRPसाठी करावे लागते खोटे कौतुक सुनिधि चौहानचा खुलासा

Subscribe

सुनिधिने इंडियन आयडल मधील परीक्षकाच्या खुर्चीचा त्याग का केला याचा उलगडा केला आहे.

इंडियन आयडल हा रियालिटी शो गेल्या काही दिवसापासून सतत वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे.अमित कुमार, अभिजीत सावंत, सोनू निगम या गायकांनंतर आता सिंगर सुनिधि चौहान हिने या मालिकेची खरी बाजू समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. सुनिधिने इंडियन इंडियन आयडल 5 आणि 6 व्या सीझनचे परीक्षण केले होते. नुकतच एका मुलाखती दरम्यान सुनिधिने इंडियन आयडल मधील परीक्षकाच्या खुर्चीचा त्याग का केला याचा उलगडा केला आहे.
“मला माझ्या मतांना बाजूला सारून कंटेस्टेंट्सची प्रशंसा करावी लागेल असे सांगण्यात आले. आणि मेकर्सना हवं आहे तसं मी करू शकत नाही. हे सगळं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी करण्यात येते. यामध्ये कंटेस्टेंट्सची काहीच चूक नाहीये. कंटेस्टेंट्स जेव्हा स्वत:चे कौतुक ऐकतात तेव्हा ते सुद्धा गोंधळून जातात. यामुळे त्यांच्यातील खरं टॅलेंट बिघडते,नाहीसे होते. म्युझिक इंडस्ट्री मध्ये नाव कमवू इच्छिनार्‍या मुलांचे नुकसान होते. कारण त्यांची व्यक्तिगत स्टोरी दाखवून रातोरात त्यांना स्टार बनण्याचे स्वप्न दाखवून त्यांच्यातील काही करून दाखवण्याच्या क्षमतेला कमी लेखण्यात येते. काही मूलं खरचं खूप मेहनत करतात पण फेम प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांच्या डोक्यावर याचा परिणाम होतो. यामध्ये कंटेस्टेंट्सची काहीच चुकी नाही.अनेकदा रेकॉर्डिंगच्या वेळेस सिगंर्सचं काही चुकत असेल तर ते सुधारण्यात येते. आणि ही चूक शो टेलिकास्ट होण्याआधीच ठीक केली जाते मी आज पर्यत्न अनेक रियालिटी शो जज केले आहेत ज्यात इंडियन आइडल, दिल है हिंदुस्तानी, द वॉइस सारख्या मोठ्या मालिकांचा समावेश आहे. पण मी आजही जे मला पटते तेच बोलणार. आणि हे शोच्या मेकर्सवर अवलंबून आहे की त्यांना मला शो मध्ये ठेवायचे आहे की नाही.”
इंडियन आइडल सारख्या मोठ्या रियालिटी शो मधील अनेक पूर्व कंटेस्टेंट्स शो मधील परीक्षक यांनी शो बद्दल नाराजी आणि आपत्ति दर्शवण्यात आली आहे.


हे हि वाचा – माधुरी दीक्षितनं केला खुलासा,का केलं नाही अभिनेत्यासोबत लग्न?कारण वाचून थक्क व्हाल!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -