घरमनोरंजन'सुबोध भावे'च्या नावे कोण उकळतं पैसे?

‘सुबोध भावे’च्या नावे कोण उकळतं पैसे?

Subscribe

अभिनेता सुबोध भावे यांना भेटण्यासाठी त्याच्या चाहत्याकडून पैसे उकळले जात, असल्याची बाब समोर आली आहे.

आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला भेटण्यासाठी बरेच चाहते वेडे होतात. मात्र त्या अभिनेत्याला भेटण्यासाठी कधी कधी अति उत्साह देखील महागात पडतो. अनेक चाहत्यांना अभिनेता किंवा अभिनेत्रीची भेट घालून देतो असं सांगून आतापर्यंत अनेक चाहत्यांना फसवलं जात असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत खूपच वाढल्याचे समोर आले आहे. असाचप्रकार अभिनेता सुबोध भावे याच्याबाबत होत असल्याचे समोर आले आहे. अभिनेता सुबोध भावे याची भेट घालून देतो असं सांगून चाहत्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सुबोधने केली फेसबुकवर पोस्ट

‘मला भेटण्यासाठी कोणी पैसे किंवा अन्य मागणी करत असेल तर अशा कोणावरही विश्वास ठेऊ नका’, असं सुबोधनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहित त्याच्या चाहत्यांना सतर्क केले आहे. माझा सख्खा भाऊ ‘सूनीत’ सोडून ‘भावे’ आडनाव लावणारा माझा कोणीही भाऊ नाही. त्यामुळे माझ्या नावे कोणी पैसे उकळत असेल तर त्या व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका’ असं सुबोधनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

- Advertisement -

अभिनेता सुबोध भावे यांच्या पोस्टवरुन भावे हे आडनाव सांगून ‘मी सुबोध भावेचा भाऊ’ असल्याचे सांगत पैसे लुटले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अभिनेता सुबोध भावेने फेसबुकवर त्याच्या चाहत्यांना सतर्क केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -