घरमनोरंजन'गेम ऑफ थ्रोन्स'चं भारतीय कनेक्शन माहितेय?

‘गेम ऑफ थ्रोन्स’चं भारतीय कनेक्शन माहितेय?

Subscribe

गेम ऑफ थ्रोन्ससाठी लागणारे कपडे, व्हिएफएक्स देखील भारतात तयार होतात. त्यामुळे 'गेम ऑफ थ्रोन्स'चं भारतीय कनेक्शन समोर आलं आहे.

गेम ऑफ थ्रोन्स!! जगातील सर्वात आघाडीची मालिका. सध्या या मालिकेचा बोलबाला सर्वत्र ऐकायला, पाहायाला मिळतो. पण, या मलिकेचं तुम्हाला भारतीय कनेक्शन माहित आहे? ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या यशामध्ये भारताचा देखील सिंहाचा वाटा आहे. याची तुम्हाला कल्पना आहे? नाही का? तर, गेम ऑफ थ्रोन्समध्ये वापरले जाणारे कपडे हे भारतात तयार होतात. याची तुम्हाला कल्पना आहे? तर, ‘गेम ऑफ थ्रोन्स’साठी वापरले जाणारे कपडे हे दिल्लीतल्या लजपतनगरमध्ये तयार होतात. विश्वास नाही ना बसत? दिल्लीताल ‘रंगारसन्स’ कंपनी ही या मालिकेसाठी लागणारे सर्व कपडे आणि तंबू पुरवते.

तर, ग्रम्स ऑफ थ्रोन्समधील ड्रॅगन्स किंवा प्राणी मुंबईतल्या ‘प्राणा’ स्टुडिओजमध्ये तयार होतात. तर, या मालिकेतील सुघड तलवारी देखील भारतातच तयार होतात. लाँगक्लॉ असो कि जॉन स्नोची, ब्रिएनची असो कि ओथकिप किंवा इतर कोणतीही तलवार. या तलवारी देखील भारतातच तयार होते. हेच काय? तर, व्हॅलेरियन स्टीलच्या तलवारीसुद्धा भारतातच बनतात. देहरादूनमधील ‘विण्डलास स्टीलक्राफ्ट्स’ ही कंपनी तलवारी तयार करते. केवळ तलवारच नाही तर चिलखते आणि जॉनस्नोचा क्लोकसुद्धा भारतात तयार होतात.

- Advertisement -

थोडक्यात काय तर, गेम ऑफ थ्रोन्सची प्रॉपर्टी ही भारतात बनते. या मालिकेच्या यशात भारताचा देखील सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये असलेल्या या कलेचा आणि टॅलेन्टचा उपयोग आणि त्याची भूरळ आता परदेशातील लोकांना देखील पडली आहे असंच म्हणावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -