घरताज्या घडामोडीगंगुबाई काठियावाडी सिनेमा चित्रपटगृहातचं होणार प्रदर्शित

गंगुबाई काठियावाडी सिनेमा चित्रपटगृहातचं होणार प्रदर्शित

Subscribe

निर्माते संजय लीला भन्साली देखील गंगुबाई काठियावाडी सिनेमा चित्रपटगृहातच प्रदर्शित करण्याच्या निर्णयावर ठाम

गेली अनेक महिने ज्या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे तो सिनेमा म्हणजे गंगुबाई काठियावाडी. अभिनेत्री आलीय भट्ट हिच्या आतापर्यंतच्या प्रवासातील गंगुबाई काठियावाडी या सिनेमा वेगळा ठरला आहे. नुकतेच या सिनेमाचे शुटींगही पूर्ण झाले. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज न होता इतर सिनेमांप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असे सर्वांना वाटत आले आहे. मात्र या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला असून सिनेमाच्या दिग्दर्शकांनी याबाबत खुलासा केला आहे. बहुप्रतिक्षित गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित न होता चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्येच जावे लागणार आहे. निर्माते संजय लीला भन्साली देखील गंगुबाई काठियावाडी सिनेमा चित्रपटगृहातच प्रदर्शित करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा प्रसिद्ध पत्रकार हुसैन झैदी यांच्या माफिया क्विन या पुस्तकावर आधारित आहे. या सिनेमासाठी निर्मात्यासह अभिनेत्री आलिया भट्ट हिने देखील प्रचंड मेहनत घेतली आहे. तब्बल २ वर्षांनी गंगुबाई काठियावाडी या सिनेमाचे शुटींग पूर्ण झाले आहे. सिनेमाचे शुटींग पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट भावूक होत तिच्या भावान सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या होत्या.

- Advertisement -

गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे कोरोना आटोक्यात येऊन चित्रपटगृहे सुरु होई पर्यंत प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे.


हेही वाचा - फरान अख्तरच्या ‘तूफान’ सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -