Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बँड वाजवतोय का? कपिल शर्माने पत्नीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गोविंदाचे उत्तर

बँड वाजवतोय का? कपिल शर्माने पत्नीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गोविंदाचे उत्तर

Related Story

- Advertisement -

द कपिल शर्मा शो मध्ये या आठवड्यातील एका एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आणि मुलीसह दिसणार आहे. अलीकडेच या भागाचे शूट पूर्ण झाले. पण इतर एपिसोडपेक्षा या एपिसोडची विशेष चर्चा झाली. कारण गोविंदा येणार असल्याने त्याचा पुतण्या कृष्णा अभिषेकने या एपिसोडमधून माघार घेतली. कपिल शर्मा शोमध्ये, कृष्णा अभिषेक सपना पार्लरवालीसह अनेक पात्र साकारतो. मात्र नुकताच गोविंदा स्टारचा एपिसोड रिलीज करण्यात आला. ज्यात कपिल शर्मा गोविंदाचा क्लास घेतना दिसतोय.

- Advertisement -

कपिलने गोविंदाला त्याची पत्नी सुनीताबद्दल असे काही प्रश्न विचारतो की, अभिनेत्याची शिट्टी गुल होते. यावर कपिल शर्मा गोविंदाची फरकी घेत विचारतो की, ‘मला सांगा सुनीता मॅडमने कोणत्या रंगाचे कानातले घातले आहेत? कोणता रंग नेल पेंट लावली आहे? मात्र गोविंदा यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. त्याला काय बोलावे सुचत नाही. यावर गोविंदा कपिल शर्माला म्हणतो की, तू प्रश्न विचारतो की माझी बँड वाजवतोय?.

अशातच गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा असा काही बोलून जाते की साऱ्यांनाच हसू आवरणे अवघड होते. सुनीता म्हणते की, ‘कपिल, तू कोणाला प्रश्न विचारतोयस यार? तू मला विचार, मी तुला हे पण सांगेन की याने कोणत्या रंगाची चड्डी घातली आहे? हे ऐकल्यावर गोविंदा आणि कपिल शर्मासह अर्चना पूरण सिंह मोठ्याने हसायला लागतात.


- Advertisement -

 

- Advertisement -