घरताज्या घडामोडी'त्याने मला कपडे उतरवण्यास सांगितलं' बॉलिवूड अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा

‘त्याने मला कपडे उतरवण्यास सांगितलं’ बॉलिवूड अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा

Subscribe

पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्रीने कास्टिंग काऊच विषयी खळबळजनक खुलासा केला आहे.

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आता कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषणाविषयी खुलासा करत असतात. त्यामुळे बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषण या गोष्टी नव्या नाही आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने हिने नाना पाटेकर यांच्या विरोधात केलेल्या खुलासा नंतर मी टू मोहिमेच्या माध्यमातून अनेक महिला आणि अभिनेत्रींनी देखील आपल्या आयुष्यात घडलेल्या अन्यायाविषयी वाच्या फोडली. आता पुन्हा एकदा वेब सीरिज आणि बऱ्याच जाहिरातीत दिसलेल्या एका अभिनेत्री कास्टिंग काऊच विषयी धक्कादायक खुलासा केला आहे. तिला ६५ वर्षीय निर्मात्याने कपडे उतरवण्यास सांगितलं होत. मल्हार राठोर असं या अभिनेत्रीचं नावं आहे. काही दिवसांपूर्वी एएफपीला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलास केल्याचं हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार समोर आलं आहे.

View this post on Instagram

That crazy little Sun of a Beach ?? ?

A post shared by Malhaar Rathod (@malhaar_rathod) on

- Advertisement -

काय म्हणाली मल्हार राठोड?

जेव्हा तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला त्यावेळी तिला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं याविषयी ती उघडपणे बोलली. तिनं सांगितलं की, ‘मला एका ६५ वर्षीय निर्मात्याने कपडे उतरवण्यास सांगितलं होत. यावेळी मी प्रचंड घाबरले होते. मला काहीच सूचतं नव्हतं की मी काय करू. मी लहान असतानाही अशा प्रकारच्या प्रसंगांना समोरं गेली होती. पण आता अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यासंदर्भात एका अभिनेत्यानं सांगितलं होत की, जर बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसेल तर तुम्हाला या क्षेत्रात टिकून राहणं फार कठिण असतं.’

View this post on Instagram

October ☀️

A post shared by Malhaar Rathod (@malhaar_rathod) on

- Advertisement -

अभिनेत्री मल्हार राठोड ही हॉटस्टारवरील ‘तेरे लिए ब्रो’, ‘सनसिल्क रिअल एफएम’, ‘होस्टेजेस सिरिज’ यामध्ये दिसली आहे. तसंच तिने अनेक जाहिराती केल्या आहेत. फक्त बॉलिवूड अभिनेत्री कास्टिंग काऊच विषयी खुलास करतात असं नसून मराठीतील अभिनेत्री देखील याविषयी खुलासा केला होता. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री श्रुती मराठेने कास्टिंग काऊजविषयी खळबळजनक खुलासा केला होता.


हेही वाचा – ऑस्ट्रेलियातील वणव्यासाठी विकले न्यूड फोटो; २ दिवसांत कमावले ५ करोड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -