घरमनोरंजनIIFA 2022 : 'सरदार उधम सिंह' आणि 'अतरंगी रे' चित्रपटाने पटकावले सर्वात...

IIFA 2022 : ‘सरदार उधम सिंह’ आणि ‘अतरंगी रे’ चित्रपटाने पटकावले सर्वात जास्त पुरस्कार

Subscribe

यावर्षी अभिनेता विक्की कौशलचा चित्रपट 'सरदार उधम सिंह' ने सर्वात जास्त पुरस्कार पटकावले आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पुरस्कार सोहळा IIFA (International Indian Film Academy) ने यावर्षीच्या विजेत्यांची घोषणा केलेली आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या चित्रपटांनी पुरस्कारांमध्ये आपली जागा मिळवली आहे. यावर्षी अभिनेता विक्की कौशलचा चित्रपट ‘सरदार उधम सिंह’ ने सर्वात जास्त पुरस्कार पटकावले आहेत.

‘सरदार उधम सिंह’ ने IIFA मध्ये सगळ्यात जास्त पुरस्कार मिळवले आहेत. खरंतर हे पुरस्कार चित्रपटाशी संबंधित टेक्निकल गोष्टींना लक्षात घेऊन दिले जातात. ज्यामध्ये स्क्रीनप्ले, एडिटिंग, कोरियोग्राफी, सिनेमोटोग्राफी, साउंड मिक्सिंग, बॅग्राउंड स्कोर यांसारख्या अनेक तांत्रिक गोष्टी लक्षात घेऊन चित्रपटांची निवड केली जाते. यावेळीचा हा 22 वा IIFA पुरस्कार सोहळा आहे. ज्याचे आयोजन 20 आणि 21 मे 2022 रोजी अबू धाबीच्या यास आइसलॅंडमध्ये केले जाईल.

- Advertisement -

IIFA 2022 तांत्रिक पुरस्कारांमधील ‘सरदार उधम सिंह’ या चित्रपटाला सर्वात जास्त तीन पुरस्कार मिळाले आहेत. तर तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ चित्रपटाला चांगल्या डायलॉगसाठी पुरस्कार मिळाले आहे. अभिनेता अजय देवगनच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाला साउंड डिजाइनसाठी पुरस्कार मिळाला आणि रणवीर सिंहच्या ’83’ चित्रपटाला साउंड मिक्सिंगसाठी पुरस्कार मिळाला. सारा अली खान आणि अक्षय कुमारच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाला बॅग्राउंडसाठी आणि कोरियोग्राफीसाठी असे दोन पुरस्कार मिळाले. तसेच ‘शेरशाह’ चित्रपटाला बेस्ट स्क्रिनप्लेसाठी पुरस्कार मिळाला.

 

- Advertisement -

 

हॉटस्टारवर ‘होम शांती’ मालिका ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -