हॉटस्टारवर ‘होम शांती’ मालिका ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि अभिनेते मनोज पाहवा या मालिकेत कौटुंबिक केमिस्ट्री शेअर करताना दिसतील.

आकांक्षा दुआ दिग्दर्शित हॉटस्टार स्पेशल प्रस्तुत ‘होम शांती’ या नवीन मालिकेच्या निमित्ताने एक नवा कोरा कौटुंबिक जीवनाचा विनोदी आणि भावनिक कथानक येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि अभिनेते मनोज पाहवा या मालिकेत कौटुंबिक केमिस्ट्री शेअर करताना दिसतील.

हॉटस्टार स्पेशल प्रस्तुत ‘होम शांती’, हिंदी वृत्तपत्रातील स्तंभलेखक उमेश जोशी, त्यांच्या सेवानिवृत्त सरकारी शाळेच्या उपमुख्याध्यापक सरला जोशी आणि त्यांची दोन मुले, जिज्ञासा जोशी आणि नमन जोशी, यांच्या जीवनाभोवती फिरणारी एक विनोदी कथा मालिका आहे. ही मालिका डेहराडूनमधील या मध्यमवर्गीय कुटुंबाचा प्रवास दाखताना दिसेल, जी एक साधी पण गोंडस कथा आहे. ज्यांना एक दिवस स्वतःचे घर बनवायचे आहे त्यांच्यासाठी ते खास आहे. होम शांती ही एक मजेदार कथा असून त्यामध्ये आई-वडील आणि भावंड एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करतात आणि त्यांच्यातील सुंदर नात्याची झलक दाखवतात.

घरातील प्रमुख महिला, सरला जोशी यांनी या वयात बदली स्वीकारण्याऐवजी सरकारी शाळेतील नोकरीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने जोशी कुटुंबाला अनेक प्रसंगाचा सामना करावा लागतो. त्यानंतर, डेहराडूनमध्ये राहणार्‍या या कुटुंबाला आता त्यांचे आरामदायी सरकारी निवासस्थान रिकामी करण्यासाठी अल्प नोटीसनंतर घर शोधण्याची समस्या भेडसावत आहे, जिथे ते गेल्या २० वर्षांपासून राहत आहेत. घर रिकामे करण्यासाठी मर्यादित वेळेसह, चार जणांचे कुटुंब वडिलोपार्जित जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावर नवीन घर बांधण्याचे काम सुरू करते. होम शांती हे एक हलके-फुलके कौटुंबिक नाट्य आहे ज्यामध्ये एक कुटुंब त्यांच्या स्वप्नातील घर बांधताना अनेक कडू गोड प्रसंगांना सामोरे जाते. हे पाहणे खूप मजेदार आहे.

 

 

Cannes 2022 : कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये दीपिका पदुकोण दिसणार ज्यूरी मेंबरच्या भूमिकेत