घरमनोरंजनरिलीज न झालेला इरफान खानचा ‘दुबई रिटर्न’ चाहत्यांच्या भेटीला

रिलीज न झालेला इरफान खानचा ‘दुबई रिटर्न’ चाहत्यांच्या भेटीला

Subscribe

फिल्म फेस्टिव्हलमध्ये इरफान खानचा ‘दुबई रिटर्न’ सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा इरफान खानला पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे.

बॉलिवूड अभिनेता इरफान खानने (Irrfan Khan)त्याच्या अभिनयाने प्रत्येक रसिकप्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. इरफानचा सिनेमा पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाका ठरतो. इरफानचे अनेक सिनेमा आशयघन तितकेचं महत्वपुर्ण  ठरले आहेत. इरफान खानच्या जाण्याने बॉलिवूडचं मोठ नुकसान झालं आहे. सोशल मीडियावर तर इरफानचे चाहते नेहमीच त्याची आठवण काढतात. याचदरम्यान आता इरफानच्या फॅनसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. इरफान खानचा  रिलीज न झालेला एक सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. इरफान खानचा २००५ सालामधील ‘दुबई रिटर्न’ हा सिनेमा वांद्रे फेस्टिव्हलमध्ये रिलीज होणार आहे. इरफान खानच्या मुलाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत हि गोड बातमी शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

- Advertisement -

२००५ सालात इंटरनॅशलन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं होतं. मात्र हा सिनेमा त्यानंतर सिनेगृहांमध्ये प्रदर्शित झाला नाही. आदित्य भट्टाचार्य यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा एक कॉमेडी फिल्म असून या सिनेमात इरफान खानने एका गँगस्टरची भूमिका साकारली होती. यंदाच्या वर्षीच बांद्रा फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच BFF ची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता अभय देओल आणि चित्रपट समीक्षक असीम छाबडा या फेस्टिव्हलच्या समितीत सहभागी झाले आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये इरफान खानचा ‘दुबई रिटर्न’ सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा इरफान खानला पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे.
कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त झालेल्या अभिनेता इरफान खान यांनी २९ एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. गेल्या दीड-दोन वर्षांपासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता. मात्र तो अपयशी ठरला.



हे हि वाचा – कला दिग्दर्शक राजू सापते यांची पुण्यात आत्महत्या, युनियन कडून मानसिक जाच

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -