घरमनोरंजनईशानची तलावात उडी मारून सापांना 'धडक'

ईशानची तलावात उडी मारून सापांना ‘धडक’

Subscribe

उडी मारत असलेल्या तलावात भरपूर साप होते हे दिग्दर्शक शशांक खेतानकडून कळल्यानंतर ईशान आणि जान्हवीला धक्काच बसला.

‘धडक’ चे दोन्ही कलाकार ईशान खट्टर आणि जान्हवी यांचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. नुकतंच या चित्रपटाचं ‘पहली बार’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात जान्हवीकडे बघत ईशान खाली तलावामध्ये उडी मारताना दिसत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही उडी मारत असताना या तलावात एकापेक्षा जास्त साप आहेत, याची ईशान आणि जान्हवीला जराही कल्पना नव्हती. बसला ना धक्का तुम्हालाही? त्यांनाही हे कळल्यानंतर असाच धक्का बसला होता. शशांक, ईशान आणि जान्हवीच्या एका मुलाखतीमध्ये शशांकनं सांगितल्यानंतर दोघांनाही बसलेला धक्का एका व्हिडिओमधून दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सापांचा शशांकडून झाला खुलासा

‘धडक’च्या टीमकडून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये ईशान, जान्हवी आणि शशांक या ‘पहली बार’ गाण्याविषयी बोलत आहेत. या गाण्यात ईशान तलावात उडी मारताना दिसत आहे. हा तलाव ८० फूट खोल होता, तर त्याच्या जिन्यातील एका पायरीमध्ये साधारणतः ४ फूटाचं अंतर होतं. त्यात ईशानला उंच जागेपासून उडी मारण्याची भीती पण वाटत होती असं शशांकनं सांगितलं. तर, या तलावात बरेच साप असल्याचं मात्र ईशान आणि जान्हवीला अजिबात सांगण्यात आलं नव्हतं. ही गोष्ट व्हिडिओमध्ये शशांकनं खुलासा केला असता, ईशानला मोठा धक्का बसला. ही गोष्ट जान्हवीसाठीदेखील धक्कादायक होती. कारण त्यांना एकच साप असल्याची कल्पना होती. त्यामुळंच ही उडी अतिशय सहजरित्या ईशानला जमली असं शशांकनं सांगितलं.

- Advertisement -

घाबरत असूनही दिला शॉट

पाण्यात उडी मारायच्या आधी जिन्यांवर आपटणार तर नाही ना? याचीदेखील ईशानला भीती होती. मात्र, शॉटच्या वेळी जान्हवीकडे बघत चेहऱ्यावर एक निरागसता ठेऊन ईशाननं मारलेली उडी सध्या चाहत्यांना आवडत आहे. ‘धडक’ चित्रपट २० जुलैला चित्रपटगृहात येणार असून जान्हवी कपूरचा हा पहिलाच चित्रपट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -