जॅकलिन फर्नांडिस आणि जॉन अब्राहमचा ‘Attack’ रिलीजसाठी सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

jacqueline fernandez rakul preet singh and john abrahams attack movie to be released on this day
Jacqueline Fernandez आणि John Abraham 'अटॅक' रिलीजसाठी सज्ज

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो जॉन अब्राहम आणि जॅकलिन फर्नांडिसच्या एका नव्या कोऱ्या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर आऊट झालयं. ‘अटॅक पार्ट 1’ असं या सिनेमाचं नाव आहे. त्याच पोस्टर त्यातील स्टार कास्ट सोशल मीडियावर रिलीज जाहीर करण्यात आली आहे. तर 1 एप्रिल रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या पोस्टरमध्ये जॉन अगदी डॅशिंग अंदाजात दिसतोय.

जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंग अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. यापूर्वी अटॅक चित्रपटाचे पोस्टर आणि प्रोमो व्हिडीओ रिलीज झाले होते. ज्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे जॉन अब्राहमसाठी अटॅक हा चित्रपट त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. जॉन अब्राहमने त्याच्या सोशल मीडियावरून हे पोस्टर शेअर केले आहे. तयार रहा ‘अटॅक’साठी… याचा पहिला भाग 1 एप्रिल 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

या पोस्टरवरून जॉन अब्राहम एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे अंदाज बांधले जात आहे. मात्र त्याच्या भूमिकेबाबत कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही. तरीसुद्धा ही एका सुपर सोल्जरची कथा असल्याचे म्हटलं जात आहे.

तर दुसरीकडे जॅकलिनने सुद्धा या चित्रपटाचे पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे, तिने देखील जॉन अब्राहमप्रमाणे कॅप्शन दिली आहे. यावरून हा आता चित्रपटातील पात्रांचा आणि कथेचा अंदाज बांधला जात आहे. 7 मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. मात्र जॉनने शेअर केलेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय बनतोय. हा चित्रपट 1 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘अटॅक’ तीन भागांमध्ये रिलीज होणार आहे, ज्याचा पहिला भाग एप्रिलमध्ये रिलीजच्या मार्गावर आहे.

‘अटॅक’सह जॉन अब्राहम आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’, ‘पठाण’ आणि ‘तेहरान’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यातील तेहरान हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.