घरमनोरंजनआंदोलक शेतकऱ्यांचा जान्हवी कपूरचे चित्रपट शुटिंग रोखले

आंदोलक शेतकऱ्यांचा जान्हवी कपूरचे चित्रपट शुटिंग रोखले

Subscribe

'गुड लक जेरी' च्या शुटिंगदरम्यान शेतकऱ्यांकडून 'जान्हवी कपूर पर जा' च्या घोषणाबाजी

दिल्लीच्या सीमारेषेवरील शेतकऱ्यांच्या तीव्र कृषी कायद्याविरोधी आंदोलनाची झळ बॉलिवूडला देखील बसत आहे. दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘गुड लक चेरी’ चित्रपटाच्या चित्रकरणाला विरोध दर्शवला आहे. या चित्रपटाचे शुटींग सध्या पंजाबच्या पटियालामध्ये सुरु होते परंतु आंदोलक शेतकऱ्यांनी सेटवर येत शुटिंग थांबण्याचे आदेश दिले. मिडिया रिपोर्टनुसार, पंजाब राज्यातील शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याला तीव्र विरोध सुरु आहे. त्यामुळे पटियालामध्ये ‘गुड लक चेरी’ चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना काही आंदोलक शेतकऱ्यांनी शुटिंगला विरोध करत अचानक शुटिंग बंद करण्यास सांगितले. तसेच शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. यावेळी जान्हवी’कपूर पर जा’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. शनिवारी २३ जानेवारी दरम्यान हा प्रकार घडला आहे. आंदोलकांनी चित्रपटाच्या स्टाफ, क्रू मेंबर आणि कास्ट टीम राहत असलेल्या हॉटेलबाहेर देखील घोषणाबाजी केली. बॉलिवूड कलाकांनी कृषी कायद्याविरोधात समर्थन द्यावे अशी या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान या शहरात चित्रपटाच्या शुटींगविरोध तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.

यादरम्यान १० जानेवारीला देखील आंदोलक शेतकऱ्यांनी जान्हवी कपूरच्या चित्रपटाचे शुटिंग बंद पाडले होते. यावेळी जान्हवीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली होती. यात जान्हवीने लिहिले होते की, शेतकरी आपल्या देशाच्या ह्रदयात आहेत. मी देशाच्या अन्नदात्यांचे महत्त्व समजू शकते आणि त्यांचे आदरही करते, मला विश्वास आहे की लवकरचं या आंदोलनावर तोडगा निघेल ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ‘गुड लुक जैरी’ हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झालेल्या तमिळ कोलामवु कोकिला या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. सिद्धार्थ सेनगुप्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आनंद रायने याची निर्मिती केली आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -