घरमनोरंजन'गोदावरी' चित्रपटासाठी जितेंद्र जोशीने पटकावला 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

‘गोदावरी’ चित्रपटासाठी जितेंद्र जोशीने पटकावला ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

Subscribe

मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याला ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०२२’ मध्ये ‘गोदावरी’ चित्रपटासाठी सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची गोष्ट असून सर्वस्तरातून जितेंद्र जोशीचे कौतुक केले जात आहे. खरंतर या चित्रपट महोत्सवात ओपनिंग फिल्म म्हणून ‘गोदावरी’ चित्रपटाची निवड करण्यात आली होती.

निखिल महाजन दिग्दर्शित, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशीसह ,गौरी नलावडे, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाध हे कलाकार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri🌸 (@gaurinalawadeofficial)

- Advertisement -

 अभिनेत्री गौरी नलावडे हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
त्यात खाली कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, “क्षण अभिमानाचा! New York Indian Film Festival 2022 मध्ये गोदावरीसाठी जितेंद्र जोशीला ‘उत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार !
IFFI मध्ये मानाचा Silver Peacock पुरस्कार पटकावल्यानंतर अभिनयाच्या या दुसऱ्या पुरस्कारासाठी जितेंद्र जोशीचे हार्दिक अभिनंदन!
(Our very own Jitendra Joshi wins the Best Actor award at NYIFF for GODAVARI. This is the second acting award for Jitendra after he won the prestigious Silver Peacock at the International Competition at IFFI.)”

‘गोदावरी’ चित्रपटामध्ये जितेंद्र जोशीने निशिकांत ही भूमिका साकारली आहे. जो त्याच्या कुटुंबापासून दूर गेलेला असतो. त्याच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याला त्या नदीजवळ यावे लागते. ज्या नदीचा त्याला तिरस्कार असतो.

- Advertisement -

 


हेही वाचा :केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर किरण मानेंनी व्यक्त केला संताप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -