केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर किरण मानेंनी व्यक्त केला संताप

मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. केतकी अनेकदा सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडली आहे. तिच्या अशा वक्तव्यांमुळे सोशल मीडिया युजर्स तिला ट्रोल करत असतात. मात्र आता तिने पुन्हा असंच एक वादग्रस्त कृत्य केलेलं आहे. ज्यामुळे तिच्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकी चितळेने तिच्या फेसबुक अकाउंटवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टमध्ये अॅडव्होकेट नितीन भावे या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकीने शेअर केली.

दरम्यान केतकीच्या या आक्षेपार्ह पोस्टमुळे ठाणे पोलिस शाखेनं केतकीला कळंबोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. केतकीच्या या संपूर्ण प्रकरणावर आता अभिनेता किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केलेली ही पोस्ट सोशलवर मीडियावर चांगल्याच चर्चेत आहे. या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. ‘खरं आहे दादा’ , ‘माने सर बरोबर आहे’, ‘आपलं यांची जातीवादी वृत्ती प्रत्येक क्षेत्रात दिसून येते’, ‘आपले विचार आवडले दादा’ अशा अनेक कमेंट किरण मानेंच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी मुलगी झाली हो या मालिकेमुळे किरण माने चर्चेत आले होते.

 


हेही वाचा :‘वाय’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला