घरमनोरंजनजिम सरभच्या रेप जोकवर हसल्याने कंगना झाली ट्रोल

जिम सरभच्या रेप जोकवर हसल्याने कंगना झाली ट्रोल

Subscribe

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या कारपेटवर वॉक करण्याची संधी फार कमी कलाकारांना प्राप्त होते. यावर्षी दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, मल्लिका शेरावत, कंगना राणावत आणि जिम सरभ हे कान्स फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित होते. या फेस्टिव्हलला उपस्थित असणारी कंगना मात्र सध्या नेटिझन्सकडून ट्रोल केली जात आहे. याचे कारण वाचून नक्कीच तुम्ही हैराण व्हाल.

कान्स फिल्म फेस्टिव्हलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कंगना आणि जिम सरभ एकत्र दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी कंगनाला ट्रोल करायला सुरवात केली. तुम्ही विचार कराल असे काय आहे या व्हिडिओमध्ये की, कंगनाला ट्रोल करण्यात येत आहे? वास्तविक या व्हिडिओमध्ये जिम सरभ रेपवर एक जोक ऐकवत असताना कंगना जोकवर हसताना दिसत आहे.

- Advertisement -

जिम सरभ आणि कंगनाचे हे वागणे लोकांना आवडले नसल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. ‘जर माझ्यावर १२ वेश्यांनी बलात्कार केला आणि त्यानंतर मी दारू प्यालो तर लोक मलाही पंजाबी म्हणतील.’ असे वक्तव्य यावेळी जिमने केले होते. बलात्कारासारख्या गंभीर मुद्यावर कोणी विनोद कसा करू शकतो? अशा शब्दात लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तर बलात्कार हा विनोदाचा भाग नाही, असेही काही लोकांनी जिम आणि कंगनाला सुनावले आहे. तसेच सलमानच्या वक्तव्यावर कंगनाने आपले मत मांडले होते आणि आता स्वतः ती त्याच गोष्टीवरून हसत असल्याचेदेखील लोकांनी कंगनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -