घरमुंबईडोंबिवलीमध्ये सुरक्षारक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

डोंबिवलीमध्ये सुरक्षारक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Subscribe

डोंबिवलीमध्ये १५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

डोंबिवली येथे रहाणारी पीडित मुलगी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी गेली होती. त्याठिकाणावरुन घरी परतत असताना लोकराज थापा याने पीडित मुलीचे अपहरण केले. रस्त्यावर कोणी नसल्याचा फायदा घेत थापाने पीडित मुलीच्या तोंडाला रुमाल लावून तिला बेशूध्द केले. त्यानंतर आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तिला कारमधून निर्जनस्थळी नेण्यात आले. पीडितेच्या लहान बहिणीला ठार मारण्याची धमकी देत थापाने तिच्यावर बलात्कार केला. आरोपींकडून सुटका झाल्यानंतर मुलीने घडलेला प्रसंग घरी जाऊन पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी सुरक्षारक्षक लोकराज थापा आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टिळकनगर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

बलात्कार करणारा २५ वर्षीय आरोपी लोकराज थापा डोंबिवलीत आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. पीडित मुलगी ज्या भागात राहते त्याच परिसरात तो सुरक्षरक्षकाचे काम करतो. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे दोन पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -