घरमनोरंजनVideo : कंगना म्हणते; मूव्ही माफियांमुळेच झाला सुशांतचा मृत्यू

Video : कंगना म्हणते; मूव्ही माफियांमुळेच झाला सुशांतचा मृत्यू

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील नेपोटिझमचा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. अभिनेत्री कंगना रनौतने सुशांतच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी एक व्हिडिओ शेअर करून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप बॉलीवूडमधील काही दिग्गजांवर केला होता. आता पुन्हा एकदा कंगनाने तिच्या सोशल साईट्सवर व्हिडिओ शेअर करून बॉलीवूडमधील मूव्ही माफियांवर निशाणा साधला आहे. कंगनाने उघडपणे करण जोहर, सलमान खान यांच्यावर आरोप करत या लोकांमध्ये गॉडफादर नसणाऱ्यांचे खच्चीकरण होत असल्याचे तिने यापूर्वीही अनेकदा म्हटले आहे.

काय म्हणाली कंगना 

कंगनाने आताच्या व्हिडिओमध्ये सुशांतच्या संबंधी कोणकोणत्या पेपरमध्ये कशा बातम्या छापून आल्या आहेत, याची यादी वाचून दाखवली आहे. अशा बातम्यामुळे कोणाचेही खच्चीकरण होईल. त्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसते. मात्र अशा निगेटिव्ह पब्लिसिटीच्या बातम्या स्टार किड्सच्या बाबतीत छापून येत नाही. या इंडस्ट्रीमध्ये मूव्ही माफियांचा राज चालतो. काही लोकांमुळे आणि ठराविक मीडिया ग्रुपमुळे सुशांतला आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे तिने म्हटले आहे.

- Advertisement -

पहिल्या व्हिडिओतही केले आरोप 

यापूर्वीही कंगनाने सुशांतच्या आत्महत्येवर काही प्रश्न उपस्थित केले होते. कंगना म्हणाली होती की, सुशांत सिंह राजपूतने नैराश्यामुळे आत्महत्या केली अशा बातम्या माध्यमातून येऊ लागल्या. पण एक हुश्शार मुलगा डिस्प्रेशनचा शिकार का झाला याचा कोणी विचार केला आहे का. सुशांतला सहजपणे नैराश्याचे लेबल लावले पण संजय दत्त यांच्या अॅडिक्शनला तुम्ही क्युटनेस म्हणता. बॉलीवूडमध्ये गॉडफादरशिवाय स्वतःचे करिअर बनवणाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच दुजाभाव केला जातो. सुशांतच्या एम. एस. धोनी, केदारनाथ, छिछोरे चित्रपटातील भूमिकांसाठी कोणतेही कौतुक झाले नाही पण गल्ली बॉयसारख्या फालतू चित्रपटाला पुरस्कार मिळतात. लोकांनी त्याला तू एकटा आहेस असे मनावर बिंबवून एकटे पाडले. ही आत्महत्या नव्हे तर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची घटना असल्याचे तिने नमूद केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -