घरमनोरंजनवादग्रस्त ट्विट करणाऱ्या कंगनावर ट्विटरची कारवाई; संतापलेल्या 'क्वीन'नं दिली धमकी

वादग्रस्त ट्विट करणाऱ्या कंगनावर ट्विटरची कारवाई; संतापलेल्या ‘क्वीन’नं दिली धमकी

Subscribe

वादग्रस्त वक्तव्य करुन नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर आता ट्विटरने कारवाई केली आहे. वादग्रस्त ट्विट करणाऱ्या कंगनाच्या अकाऊंटवर तात्पुरते निर्बंध आणले होते. तांडव चित्रपटाच्या निर्मात्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ट्विटरने कारवाई केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, ट्विटरने कारवाई करताच कंगना चिडली असून तिने धमकी दिली आहे.

तुमचं जगणं अवघड बनवेन

ट्विटर अकाऊंटवर निर्बंध येताच कंगनाने संताप व्यक्त केला. तिने अकाऊंट सुरळीत होताच ट्विट करत धमकी दिली आहे. “लिबरल लोक आपले काका जॅक यांच्याकडे जाऊन रडत आहेत आणि माझ्या अकाउंटवर काही काळासाठी निर्बंध आणले आहेत. ते मला धमक्याही देत आहेत. ट्विटरवरच अकाउंट म्हणजेच माझी व्हर्चुअल ओळख देशासाठी शहीद होऊ शकते. मात्र, माझं रिलोडेड देशभक्तीचं व्हर्जन सिनेमांद्वारे पुन्हा पुन्हा परत येईल. याद्वारे तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेल,” असं कंगनाने म्हटलं आहे.

- Advertisement -

‘तांडव’च्या वादात कंगनाची उडी

वेब सीरिज तांडववर सुरु असलेल्या वादात कंगनाने उडी घेत प्रतिक्रिया दिली होती. तांडवच्या निर्मत्यांविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यानंतर कंगनाचं अकाऊंटवर कारवाई करण्यासाठी #SuspendKanganaRanaut असा ट्रेंड सुरु झाला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -