घरताज्या घडामोडीCoronaVirus: 'दारू प्यायल्याने पोटातच कोरोना मरतो का?', कार्तिकचा डॉक्टरांना प्रश्न

CoronaVirus: ‘दारू प्यायल्याने पोटातच कोरोना मरतो का?’, कार्तिकचा डॉक्टरांना प्रश्न

Subscribe

कोरोना व्हायरसच्या संकटात बॉलिवूड कलाकार अनेक माध्यमातून जनजागृती करताना दिसत आहेत. दरम्यानच बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यनने खास लोकांसाठी ‘कोकी पूछेगा’ ही सीरिज सुरू केली आहे. कार्तिक आर्यनाच्या या सीरिजचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यामध्ये कार्तिक डॉक्टर मीमांसा बुच यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे. या सीरिजमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनने कोरोना व्हायरसशी संबंधित आणि अफवांबद्दल चर्चा केली आहे. कार्तिक आर्यनच्या या सीरिजच्या व्हिडिओला आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडिओमध्ये कार्तिकने डॉक्टर बुच यांना विचारले की, जास्त उष्णता असलेल्या ठिकाणी कोरोना व्हायरस नष्ट होतो का? यावर डॉक्टरांनी उत्तर दिले की, ही एक अफवा आहे. त्यानंतर कार्तिकने पुढचा प्रश्न विचारला की, दारू प्यायल्याने पोटात कोरोना व्हायरस मरतो का? डॉक्टरांनी या प्रश्नाचे उत्तर दिले की ही पण एक अफावाच आहे. अशाप्रकारचे त्याने या व्हिडिओमध्ये डॉक्टरांना प्रश्न विचारले आहेत.

- Advertisement -

कार्तिक आर्यनने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं की, शिकावू विद्यार्थ्यांवर आपण हसत होतो ना? डॉक्टर मीमांसासोबत कोकी पूछेगाचा दुसरा एपिसोड. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ११ हजारहून अधिक झाली आहे. त्यापैकी ३९० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच १ हजार ३१६ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: …म्हणून कोरोनाच्या संकटातून उत्तर कोरिया बचावला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -