घरमनोरंजनआयपीएल क्लोजिंग सेरेमनीमध्ये कतरिना करणार 'स्वॅग से स्वागत'

आयपीएल क्लोजिंग सेरेमनीमध्ये कतरिना करणार ‘स्वॅग से स्वागत’

Subscribe

 

लाईव्ह शो आणि परफॉर्मन्स म्हटलं की, कतरिनाचं नाव डोळ्यासमोर आल्याशिवाय राहात नाही. २०१६ मध्ये आयपीएलच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीमध्ये कतरिनाने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. आता दोन वर्षांनी कतरिना प्रेक्षकांचं ‘स्वॅग से स्वागत’ करायला सज्ज झाली आहे. २०१६ मध्ये तिने केलेल्या परफॉर्मन्समध्ये तिच्या नृत्यापेक्षा तिच्या अॅब्सचीच जास्त चर्चा झाली होती. त्यामुळे यावर्षी कतरिना आपल्या नृत्याने प्रेक्षकांना भुरळ पाडेल का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल.

- Advertisement -

सध्या तरी कतरिनाने आपल्या परफॉर्मन्ससाठी नक्की कोणत्या गाण्यांची निवड केली आहे हे गुलदस्त्यातच आहे. पण यावर्षी आयपीएलच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये तिच्या १० मिनिटांच्या परफॉर्मन्सचा प्रेक्षक आनंद घेऊ शकणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘टायगर जिंदा है’ मधील ‘स्वॅग से स्वागत’ या गाण्यासह आपल्या काही ब्लॉकब्लस्टर गाण्यांवर कतरिना थिरकणार असल्याची सध्या बातमी आहे. २७ मे रोजी होण्याऱ्या आयपीएल क्लोजिंग सेरेमनीमध्ये सर्वात महागडी परफॉर्मर असल्याचीदेखील सध्या कुजबूज आहे. आपल्या इतर चित्रपट आणि जाहिरातींच्या शूटिंगमधून वेळ काढून कतरिना आपल्या परफॉर्मन्ससाठी सराव करण्यात व्यस्त आहे. यावर्षी आयपीएलच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये कतरिना परत आपला जलवा दाखवेल की नाही याकडेच सध्या तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आपल्या ठुमक्यांनी नेहमीच कतरिनाने प्रेक्षकांनी मन जिंकून घेतलंय. कतरिना ही स्टेजवर परफॉर्मन्स देणारी सर्वात महागडी कलाकार आहे असं नेहमीच म्हटलं जातं. दरम्यान कतरिना सध्या आपल्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असून अजूनही टायगर जिंदा है च्या यशाची चव चाखत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -